एक्स्प्लोर
फक्त 'या' एका योजनेत करा गुंतवणूक, रिटायरमेन्टनंतर कधीच येणार नाही पैशांची अडचण!
निवृत्तीनंतर अनेकांपुढे अनेक आर्थिक अडचणी येतात. पण याच अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून तुम्ही या योजनेत पैसे गुंतवायला हवेत.
ppf scheme information (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

Public Provident Fund Interest Rate: नोकरीतून निवृत्ती घेतल्यानंतर नियमित उत्पन्नाचा स्त्रोत शिल्लक राहात नाही. त्यामुळे निवृत्तीनंतरचे आयुष्य चांगले आणि आर्थिक चणचणीविना जाण्यासाठी मोठी बचत केलेली असणे गरेजेचे आहे. अशा बचतीसाठी पीपीएफसारख्या योजना मदतीला येतात. पीपीएफ योजनेत पैसे गुंतवून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.
2/7

पीपीएफ अकाऊंट कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खोलता येते. पीपीएफ खात्यात एकूण 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. तुम्ही जमा केलेल्या पैशांवर सरकार 7.1 टक्के दराने चक्रवाढ व्याज देते.
3/7

पीपीएफ खात्यात एका वर्षात कमीत मी 500 रुपयांपासून ते 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. म्हणजेच 15 वर्षात पीपीएफ खात्यात तुम्हाला जास्तीत जास्त 22.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
4/7

या योजनेअंतर्गत गुंतवणुकीचे 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही बचत पाच-पाच वर्षांनी वाढवू शकता. पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत 1.50 रुपयांची करसवलत मिळवता येते.
5/7

समजा एखादी व्यक्ती पीपीएफ योजनेअंतर्गत महिन्याला 500 रुपये गुंतवत असेल तर मॅच्यूरिटीपर्यंत या व्यक्तीला एकूण 1.62 लाख रुपये मिळतील.
6/7

तुम्हाला निवृत्तीनंतर मोठा आर्थिक निधी हवा असेल आणि तुम्ही महिन्याला 12,500 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर 40.68 लाख रुपये मिळू शकतात.
7/7

(टीप- इंटरनेटवर अपलब्ध असलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारावर हा लेख लिहिण्यात आला आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक करताना या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या. किंवा अधिकृत संस्था, लोकांशी संपर्क साधा.)
Published at : 17 Aug 2024 08:28 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























