एक्स्प्लोर
EPF Balance : पीएफ खात्यात किती पैसे शिल्लक, ईपीएफओच्या वेबसाईटवरुन पासबुक कसं डाऊनलोड करणार?
How To Download PF Passbook: खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते.

ईपीएफ पासबुक कसा तपासणार
1/5

खासगी कंपन्या किंवा आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधी कपात करुन ईपीएफओकडे जमा केला जातो. कर्मचाऱ्याला निवृत्त झाल्यानंतर ईपीएफओकडून पेन्शन आणि प्रॉविडंट फंडची रक्कम दिली जाते.
2/5

अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात किती पीएफ जमा झाला हे माहिती नसतं. पीएफ खात्यातील शिल्लक पाहण्यासाठी चार पर्याय उपलब्ध आहेत.
3/5

पहिला पर्याय ईपीएफओच्या यूएएन पासबुक या पोर्टलवर यूएएन क्रमांक आणि पासवर्डच्या सहाय्यानं लॉगीन करुन तुम्ही ज्या संस्थेत काम केलं आहे तो पासबूक क्रमांक सिलेक्ट करुन तुमच्या खात्यात किती रक्कम आहे ते पाहता येईल. ते तुम्ही डाऊनलोड देखील करु शकता.
4/5

उमंग अॅपवरुन देखील पीएफ खात्यात रक्कम किती जमा झाली ते पाहता येतं. उमंग अॅपमध्ये ईपीएफ पासबुक आणि त्यांच्या क्लेमची स्थिती पाहता येईल. त्यासाठी नोंदणी करावी लागेल.
5/5

ईपीएफओचे सदस्य 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवून शिल्लक रक्कम पाहू शकतात. तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर मेसेज करुन AN EPFOHO ENG टाइप करुन मेसेज पाठवू शकता. याशिवाय 9966044425 या क्रमांकावर मिसकॉल पीएफ बॅलन्स पाहू शकता.
Published at : 10 Sep 2024 03:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
विश्व
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion