एक्स्प्लोर
SIP : एसआयपी बंद करण्याचा विचार करताय? 'ही' पाच कारण एसआयपी थांबवण्यासाठी ठरतील योग्य
SIP : एसआयपी म्हणजेच सिस्टीमेटिक इन्वेस्टमेंट प्लॅनद्वारे ठराविक रक्कम दरमहा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवता येते. काही वेळा एसआयपी बंद करावी लागते.
एसआयपी
1/6

तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करत असाल आणि काही कारणांमुळं बंद करण्याचा विचार करत असाल तुमचा निर्णय योग्य का अयोग्य असा विचार मनात येऊ शकतो.
2/6

सामान्यपणे वेल्थ सल्लागार एसआयपी मध्येच बंद करु नये असं सांगतात. जेव्हा बाजारात घसरण होत असते. तेव्हा रुपी कॉस्ट अवरेजचा विचार करता कमी किमतीवर अधिक यूनिटस मिळू शकतात. मात्र काही नियमांना अपवाद असू शकतात.
3/6

सप्टेंबर 2025 मध्ये 44.03 लाख एसआयपी खाती बंद झाली. ऑगस्टमध्ये ही संख्या 41.15 लाख होती म्हणजेच ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये 7 टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये 40.31 लाख एसआयपी खाती बंद झाली होती. यामध्ये ज्यांचा कालावधी पूर्ण झालाय अशी खाती देखील होती.
4/6

तुमचं वित्तीय ध्येय पूर्ण झालं असल्यास एसआयपी थांबवणं योग्य आहे. एक मोठी एसआयपी थांबवून वेगवेगळ्या फंडमध्ये छोट्या रकमेच्या एसआयपी सुरु करायची असतील तर तो निर्णय देखील योग्य ठरु शकतो.
5/6

चुकीच्या फंडमध्ये गुंतवणूक सुरु झाली असेल त्यात सुधारणा करण्यासाठी एसआयपी बंद करु शकता. त्यासाठी एसटीपीचा पर्याय वापरू शकता. दीर्घकाळ नुकसान सहन करण्यापेक्षा इंडेक्स फंडमध्ये स्विच करणं योग्य ठरेल. आर्थिक अडचणीच्या काळात एसआयपी थांबवणं समजूतदारपणाचा निर्णय ठरु शकतो.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 09 Nov 2025 11:33 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
भारत
व्यापार-उद्योग
























