World's Richest Country : जगातील सर्वात श्रीमंत देश! अमेरिका किंवा जपान नाही तर... ; सोयीसुविधा एकदम हायटेक
World's Richest Country : महासत्ता अमेरिका जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. पण श्रीमंतीच्या बाबती अमेरिका पहिल्या क्रमांकावर नाही. मग, जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता, जाणून घ्या.
मुंबई : भारत (India) जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे तर, महासत्ता अमेरिका (America) जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. अमेरिकेनंतर चीन, जपान, जर्मनी आणि भारत या जगातील सर्वात मोठ्या पाच अर्थव्यवस्था आहेत. पण, हे पाच देश जगातील सर्वात श्रीमंत देश (World's Richest Country) नाहीत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जगातील टॉप-5 अर्थव्यवस्था असलेल्या देशांपैकी एकही देश सर्वात श्रीमंत टॉप 5 देश नाहीत. अमेरिका किंवा जपान जगातील सर्वात श्रीमंत देश नाहीत. श्रीमंत देशाची गणना अर्थव्यवस्थेवरून नाही तर, जीडीपी आणि पीपीपी यांच्या आधारावर होते.
जगातील सर्वात श्रीमंत देश
एखाद्या देशाचा जीडीपी आणि पीपीपी याच्यावरून त्या देशाची श्रीमंती ठरते. जीडीपी म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) म्हणजे एखाद्या देशाच्या भौगोलिक सीमांमध्ये उत्पादित वस्तू आणि सेवा. पीपीपी (PPP) म्हणजे सार्वजनिक-खाजगी भागीदारी (Purchasing Power Parity) म्हणजे त्या देशातील लोक कशाप्रकारे वस्तू आणि सेवा खरेदी करतात. जीडीपी आणि पीपीपी अधिक असणारे देश श्रीमंत देश मानले जातात.
अमेरिका किंवा जपान नाही तर...
जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका, चीन किंवा जपान नाही तर, आर्यलँड आहे. जीडीपी आणि पीपीपी अधिक असल्यामुळे आर्यलँड जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. आर्यलँड देशाचा जीडीपी आणि पीपीपी 145,196 डॉलर आहे. हा इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक दर आहे. श्रीमंत देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर लक्जमबर्ग तर, सिंगापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत कतार आणि मकाऊ अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या लक्जमबर्ग देशातील पीपीपी 142,490 डॉलर आहे. त्यानंतर सिंगापूरचा पीपीपी 133,895 डॉलर आहे. चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या कतारचा पीपीपी 124,848 डॉलर आणि पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या मकाऊचा पीपीपी 89,558 डॉलर आहे. या देशांमध्ये उत्तम सोयीसुविधा उपलब्ध आहेत. दरम्यान, भारत या यादीत टॉप 20 मध्ये सुद्धा नाही.
जगातील सर्वात श्रीमंत देशांची यादी
1. आर्यलँड
2. लक्जमबर्ग
3. सिंगापूर
4. कतार
5. मकाऊ
महत्त्वाच्या इतर बातम्या :