एक्स्प्लोर
व्हिएन्ना करार नेमका काय आहे?
मुंबई : अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही, असं ठणकावत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला झटका दिला. भारताकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी बाजू मांडली. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचा दावा भारताने केला. शिवाय आंतरराष्ट्रीय कोर्टाचे न्यायमूर्ती रॉनी अब्राहम यांनी व्हिएन्ना कराराचा दाखला देत पाकिस्तानचा युक्तीवाद खोडून काढला.
कुलभूषण जाधव प्रकरणात व्हिएन्ना कराराचा मुद्दा भारताने लावून धरला. व्हिएन्ना करारानुसार कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत मिळायला हवी होती, असं सांगत आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानल खडसावलं.
पण हा व्हिएन्ना करार नेमका काय आहे?
राजनैतिक अधिकारी किंवा राजदूतांना दुसऱ्या देशात काही विशेषाधिकार आणि सवलती मिळतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांना अभय मिळतं. पण दुसऱ्या महायुद्धानंतर सर्व देशांना परस्परांमध्ये सौहार्द आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं गरजेचं वाटू लागलं. त्यासाठी या देशांना आपापले राजनैतिक अधिकारी किंवा राजदूत दुसऱ्या देशांमध्ये कायमस्वरूपी ठेवण्याची गरज निर्माण झाली. परंतु यासाठी काही विशेष आणि सर्वमान्य तरतुदींची गरज होती.
यासाठी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये 18 एप्रिल 1961 रोजी आयोजित परिषदेत आंतरराष्ट्रीय कायदे मंडळाने अशा तरतुदी प्रत्यक्षात आणल्या. त्यानंतर या तरतुदी व्हिएन्ना करार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. एकूण 52 कलमी हा करार असून, राजनैतिक अधिकाऱ्यांच्या अधिकारांचे आणि सवलतींची त्यात विस्तृत माहिती आहे.
या कराराला 189 देशांनी मान्यता दिली आहे. तर भारताने 15 ऑक्टोबर 1965 रोजी कराराला संमती दिली. यातील तरतुदींना 1972 मध्ये कायद्याचं स्वरुप प्राप्त झालं.
या कायद्यानुसार, राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय दूतावासामध्ये त्रयस्थ व्यक्तीला प्रवेश करता येत नाही. अशा अधिकाऱ्यांचा पत्रव्यवहार, चिन्हांकित बॅगांची झडती घेता येत नाही. शिवाय त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष कर द्यावे लागत नाहीत. राजनैतिक अधिकाऱ्यांवर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकत नाही. पण या अधिकाऱ्यांच्या खासगी मिळकतीसंदर्भात तसंच त्याने कार्यकक्षाबाहेर केलेल्या कृत्याबाबत कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो.
संबंधित बातम्या :
अंतिम निकालापर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही : कोर्ट
कुलभूषण जाधव प्रकरणी काही तासातच फैसला
पाकचा सर्वात मोठा पुरावा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळला!
आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती
भारताची पहिली चाल यशस्वी: अॅड. उज्ज्वल निकम
कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडीओत 102 कट्स
कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी जोरदार हालचाली
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement