एक्स्प्लोर

Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल

Khanapur ZP Election Result : खानापूर तालुक्यात भाजपला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची एकही जागा जिंकला आली नाही. या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेने एकतर्फी बाजी मारल्याचं दिसून आलं.

सांगली : 'मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार, मी कोण आहे. माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री बसला आहे' अशा शब्दात भाजपला आव्हान देणारे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर (Suhas Babar) यांनी त्यांचा गड राखला आहे. सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भाजपचा सुपडासाफ केल्याचं दिसून आलं. खानापुरातल्या जिल्हा परिषदेच्या चारही जागा आणि पंचायत समितीच्या आठही जागा शिवसेनेने जिंकल्या असून भाजपला भोपळाही फोडता आला नाही. 

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या सुहास बाबरांनी त्यांचा करिश्मा कायम ठेवला. जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 ही जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. 

Khanapur ZP Election Result : शिवसेनेचा जल्लोष

नागेवाडी जिल्हा परिषद गटातून आमदार सुहास बाबर यांच्या वहिनी, शिवसेनेच्या उमेदवार डॉ. शीतल बाबर या विजयी झाल्या. खानापूर तालुक्यात शिवसेनेला भरघोस यश मिळाल्यानंतर आमदार सुहास बाबरांनी शड्डू ठोकला. त्याचसोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही एकच जल्लोष केला. 

निवडणुकीच्या प्रचारावेळी, आमदार सुहास बाबर आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं होतं. त्यावेळी सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत भाजपच्या नेत्यांना इशारा दिला होता. खानापुरात दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस आपणच चालवतो असं सांगत सुहास बाबर यांनी भाजपच्या नेत्यांना दमही दिला होता. आता निवडणुकीच्या निकालामध्येही सुहास बाबर हेच वरचढ असल्याचं दिसून आलं. 

Sangli ZP Election Result : सांगली जिल्हा परिषद 61 पैकी 53 जागांचे निकाल

भाजपा - 17

राष्ट्रवादी अजित पवार - 05

शिंदेसेना - 06

काँग्रेस - 11

राष्ट्रवादी शरद पवार - 17

शिवसेना ठाकरे पक्ष - 01

रयत क्रांती संघटना - 01 

जनसुराज्य शक्ती पक्ष - 01

Sangli Panchayat Samiti Election Result : सांगली जिल्ह्यातील पंचायत समिती निकाल 

मिरज पंचायत समिती - 22 गण

भाजपा - 10

राष्ट्रवादी अजित पवार - 03

शिवसेना शिंदे - 02

काँग्रेस - 03

राष्ट्रवादी शरद पवार - 04

शिवसेना ठाकरे गट - 00

वाळवा पंचायत समिती - 22 गण

भाजपा - 04

राष्ट्रवादी अजित पवार - 00

शिवसेना शिंदे - 04

काँग्रेस - 00

राष्ट्रवादी शरद पवार - 14

शिवसेना ठाकरे गट - 00

जत पंचायत समिती - 18 गण

भाजपा - 12

राष्ट्रवादी अजित पवार - 02

शिवसेना शिंदे - 00

काँग्रेस - 04

राष्ट्रवादी शरद पवार - 00

शिवसेना ठाकरे गट - 00

शिराळा पंचायत समिती - 08 गण

भाजपा - 02

राष्ट्रवादी अजित पवार - 03

शिवसेना शिंदे - 00

काँग्रेस - 00

राष्ट्रवादी शरद पवार - 02

शिवसेना ठाकरे गट - 00

अपक्ष - 01 ( राष्ट्रवादी शरद पवार गट पुरस्कृत) 

कडेगाव पंचायत समिती - 08 गण

भाजपा - 01

राष्ट्रवादी अजित पवार - 00

शिवसेना शिंदे - 00

काँग्रेस - 07

राष्ट्रवादी शरद पवार - 00

शिवसेना ठाकरे गट - 00

तासगाव पंचायत समिती - 06 गण

भाजपा - 00

राष्ट्रवादी अजित पवार - 04

शिवसेना शिंदे - 00

काँग्रेस - 00

राष्ट्रवादी शरद पवार - 02

शिवसेना ठाकरे गट - 00

खानापूर पंचायत समिती - 08 गण

भाजपा - 00

राष्ट्रवादी अजित पवार - 00

शिवसेना शिंदे - 08

काँग्रेस - 00

राष्ट्रवादी शरद पवार - 00

शिवसेना ठाकरे गट - 00

ही बातमी वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Embed widget