एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बजरंग दल आणि विहिंप धार्मिक कट्टरतावादी संघटना: सीआयए
सीआयएने जाहीर केलेल्या यादीत भारतातील सात संघटनांचा समावेश आहे. त्यांना विविध श्रेणी देण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली: अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने जगभरातील त्या-त्या देशातील राजकीय दबाव गट आणि त्यांच्या प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दल या संघटनांना ‘धार्मिक कट्टरतावादी संघटना (militant religious organization) म्हणून घोषित केलं आहे.
तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रवादी संघटना (nationalist organization) असं म्हटलं आहे.
दरम्यान, सीआयएने कट्टरतावादी संबोधल्यामुळे बजरंग दल आणि विहिंपने कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. कट्टरतावादी हा शिक्का हटवा अन्यथा कायदेशीर कारवाई करु, असा इशारा या संघटनांनी सीआयएला दिला आहे.
सीआयएने जाहीर केलेल्या भारताच्या यादीत सात संघटनांचा समावेश आहे. त्यांना विविध श्रेणी देण्यात आल्या आहेत.
यामध्ये जम्मू काश्मीरमधील ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सला फुटीरतावादी गटात, तर जमीयत उलेमा-ए-हिंद या संघटनेचा बजरंग दल आणि विहिंपप्रमाणे कट्टरतावादी संघटनेच्या गटात समावेश केला आहे.
‘द वर्ल्ड फॅक्टबुक’ हे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा वार्षिक अहवाल आहे. या अहवालात जगातील 267 देशांची माहिती देण्यात आलेली आहे.
यामध्ये विविध देशांचा इतिहास, भूगोल, सरकार, अर्थव्यवस्था, ऊर्जा, दूरसंचार, परिवहन, लष्कर, आंतरराष्ट्रीय मुद्दे आणि राजकीय पक्षांबाबतच्या माहितीचा समावेश असतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement