अबब ! गर्लफ्रेन्ड पटावी म्हणून एक कोटी रुपये खर्चून वाढवली उंची
एका तरुणाने चक्क गर्लफ्रेंड पटवण्यासाठी उंची वाढावी म्हणून शरीरावर महागडी सर्जरी केली आहे. तेही चक्क 1 कोटी रूपये इतकी रक्कम मोजून ही सर्जरी केली आहे.
मुंबई: आपण पाहतो की, आपल्या आजबाजूला वेगवेगळ्या स्वभावाचे मित्र-मैत्रिणींची गर्दी असते. यातील काहींचा तर फार विचित्र स्वभाव असल्याचा अनुभवायला येतो. विशेषत: महाविद्यालयीन जीवनामध्ये अभ्यासासोबत बऱ्याच लेक्चर बंक करून कॉलेज कट्ट्यावर मित्र-मैत्रिणींसोबत तासंतास गप्पा मारत रंगवत असतात. यातील काहीं काहीजणांकडून तिला किंवा त्याला पटवण्यासाठी अनेक प्रकारचा खटोटोप केला जातो. यामध्ये 'ती किंवा तो' पटावा म्हणून अनेक विचित्र प्लॅनिंग करतात. हा काळ तारूण्याने ओसडून वाहणारा असतो. त्यामुळे मनात एखाद्या गोष्टीच तीव्र आकर्षण असेल तर ती मिळवण्यासाठी प्रचंड धडपड केली जाते. मग याठिकाणी प्रत्येक व्यक्तीगणिक स्वप्न, ध्येय वेगळे असू शकते. पण तिला किंवा त्याला पटवणे, हे सर्वांच्या कॉमन इंटरेस्टचा विषय असतो. यात काहींना कधी रंगामुळे, कपड्यांमुळे तर कधी उंचीमुळे स्वत: च्या आवडत्या व्यक्तीसोबत डेटवर जाण्यासाठी आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळते. मग सुरू होतो, तिला किंवा त्याला पटवण्यासाठीचा विचित्र प्रवास.. मग कधी गोरेपणासाठी अनेक प्रोडक्टसच्या क्रिम्सचा भडीमार, ब्रॅंडेड कपड्यांची खरेदी आणि उंची वाढवण्यासाठी बोर्नवीटा आणि मार्केटमधील सप्लिमेंट्सना डायटचा भाग बनवला जातो. हे तुमच्यातील प्रत्येकाने कधी ना कधी केलं असेल किंवा अनुभव घेतला असेलच.. हे इथपर्यंत ठिकाय. पण एका व्यक्तीने चक्क गर्लफ्रेंड पटवण्यासाठी उंची वाढावी म्हणून शरीरावर महागडी सर्जरी केली आहे. तेही चक्क 1 कोटी रूपये इतकी रक्कम मोजून ही सर्जरी केली आहे.
अमेरिकेतील ( America) मिनीसोटा येथील एका व्यक्तीने चक्क गर्लफ्रेंड पटवण्यासाठी आपली उंची वाढावी एक महागडी सर्जरी केली आहे. या सर्जरीवर तब्बल 1 कोटी 35 लाख रूपये इतके पैसे खर्च केले आहेत. ही सर्जरी त्याने आपल्या दोन्ही पायावर केली आहे. यामुळे त्याची पाच इंच इतकी उंची वाढली आहे. ही विचित्र व्यक्ती 41 वर्षीय मुसा गिब्स असून त्याने फक्त 5 इंच उंचीसाठी मोठा वेदनादायी संघर्ष केला आहे. यासाठी आधी उंची वाढावी म्हणून अनेक औषधे खाली आणि अध्यात्मिक बाबा-बुवांचा सल्लाही घेतला. जे आपल्याकडे विचित्र उपाययोजन केल्या जातात तशाच काहीशा उपाययोजना मुसा गिब्सने (moses gibson)केल्या आहेत.
डेटिंगसाठी केली चक्क महागडी सर्जरी
मुसा गिब्स याला उंचीवरून डेटिंगसाठी अडचणी येत असल्याचे सांगितले आहे. माझ्या उंचीबाबत मला दीर्घकाळापासून फार चांगले वाटत नव्हते. यावर सतत विचार करून मला फार वाईट वाटत होते. कारण सर्वसाधारपणे महिला उंच पुरूषांकडे बघून आकर्षित किंवा प्रभावित होतात. यामुळे डेटिंग करण्यासाठी माझी उंची बाधा ठरतेय. असं गिब्सचे म्हणणे आहे. पुढे गिब्सने म्हटले आहे की, सगळ्यांना उंच दिसण्यासाठी बूटात कागद ठेवत असे. याशिवाय उंची वाढण्यासाठी अनेक औषोधोपचारही केले आणि अध्यात्मिक बाब-बुवांचा सल्ल्यावरू अनेक उपापययोजना केल्या. पण याने काहीही फरक पडत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे उंची वाढावी म्हणून सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. या सर्जरी त्याने आपल्या दोन्ही पायांवर केली असून त्यामुळे त्यांची 5 इंच इतकी उंची वाढली. जी आधी मूळ उंची 5 फूट 5 उंच इतकी होती.
या सर्जरीसाठी दिवस-रात्र केली नोकरी
उंची वाढवण्याठी 41 वर्षीय गिब्स पेशाने इंजिनिअर असून त्याने दिवस-रात्र मेहनत केली आहे. त्याने दिवसपाळीत इंजिनिअरची आणि रात्रपाळीत टॅक्सी ड्राईव्हरची नोकरी करून सर्जरीसाठी पैसे साठवले होते. गिब्सने सहा-सात वर्षापूर्वी आपली पहिली सर्जरी केली होती. यासाठी त्याने लाखो रूपये खर्च केले आणि 3 इंच इतकी उंची वाढवली. यामुळे गिब्सला खूपच आनंदी झाला आणि दुसऱ्या सर्जरीसाठी मनाची तयारी केली. याबबात गिब्स म्हणतो की, मी एक उंची गाठण्यासाठी प्रयत्नशील व्यक्ती असून हे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या जवळ असणाऱ्या पैशामुळे शक्य झाले आहे. असेही गिब्सने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच दुसरी सर्जरी मार्च महिन्यात पार पडली असून या सर्जरीसाठी गिब्सने लाखो रूपये खर्च केले. या सर्जरीमुळे 2 इंच उंची वाढवण्यात यश मिळाले. यादरम्यान गिब्सला अनेक वेदनेतून, अडचणीतून जावे लागले आहे. यासाठी गिब्सने दांडगा संघर्ष केला आहे. या दोन सर्जरीमुळे गिब्जची उंची 5 फूट 10 इंच इतकी झाली असून त्यामुळे तो आता खूप आनंदी आहे.
इतके कोटी केले खर्च
गिब्सने दोन्ही सर्जरी करण्यासाठी तब्बल 1 कोटी 35 लाख रूपये इतका खर्च करून महागडी सर्जरी पूर्ण केली. यादरम्यान त्याची पहिल्या सर्जरीसाठी 75,000 हजार डॉलर्स तर दुसऱ्या सर्जरीसाठी 98,000 हजार अमेरिकन डॉलर्स इतका खर्च आला आहे. अशा प्रकारे 41 वर्षीय गिब्सने उंची वाढवण्यासाठी अनेक वेदना सहन केल्यात. तेही पट्टयाने चक्क गर्लफ्रेंड पटविण्यासाठी ही महागडी सर्जरी केली. हे ऐकून विचित्र वाटेल पण हे खरे आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )