US Mass Shooting : अमेरिकेत गोळीबाराच्या वाढत्या घटना, शिकागोमध्ये पाच जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी
America Firing : अमेरिकेत शिकागोमध्ये आठवड्याच्या शेवटी झालेल्या अनेक गोळीबाराच्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत.
US Mass Shooting : अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अमेरिकेत गोळीबारांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकार बंदूक संबंधित कायदे कठोर करण्यावर विचार आणि चर्चा करत आहे. शिकागोमध्ये आठवड्याच्या शेवटी अनेक गोळीबाराच्या घटना घडल्या. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे आणि 16 जण जखमी झाले आहेत. यामुळे सध्या परिसरात भीतीचं वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिकागो शहरात या आठवड्याच्या शेवटीही गोळीबार झाला. शिकागोमध्ये आतापर्यंत झालेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले आहेत. तर 16 जण जखमी झाले आहेत. आठवड्याच्या शेवटी शहरात अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या.
एका गोळीबाराच्या घटनेत दक्षिण अल्बानीच्या 0-100 ब्लॉकमध्ये शनिवारी सकाळी 12:19 वाजता एका 37 वर्षीय महिलेला गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही महिला एका नगाडीततून प्रवास करत होती. तेव्हा अज्ञात गुन्हेगारांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. या महिलेच्या डोक्यावर आणि शरीरावर अनेक गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतर महिलेला गंभीर अवस्थेत स्ट्रोजर रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात महिलेला मृत घोषित करण्यात आलं, असे पोलिसांनी सांगितलं आहे.
5 killed, 16 injured in Chicago's weekend shootings
— ANI Digital (@ani_digital) June 12, 2022
Read @ANI Story | https://t.co/txmPZP0Ltx#ChicagoShooting #GunViolence pic.twitter.com/3ZzBMWP7oE
दक्षिण इंडियानाच्या 2800 ब्लॉकमध्ये शनिवारी पहाटे 2:27 च्या सुमारास एका गाडीत 34 वर्षीय व्यक्ती बंदुकीच्या गोळीने जखमी अवस्थेत आढळून आली. या व्यक्तीच्या शरीरावर गोळीबाराच्या अनेक जखमा होत्या. जखमी व्यक्तीला गंभीर अवस्थेत शिकागो विद्यापीठाच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याला डॉक्टरांना मृत घोषित केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या