(Source: ECI/ABP News/ABP Majha)
US Mass Shooting: अमेरिकेत पुन्हा अंधाधुंद गोळीबार, ओक्लोहोमामध्ये 5 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर
US Mass Shooting: ओक्लोहोमा राज्यातील टल्सा शहरातल्या रुग्णालयाबाहेर हल्लेखोर आला आणि त्यानंतर त्यानं गोळीबार सुरु केला. सेंट फ्रांसिस हॉस्पिटलबाहेर अचानक झालेल्या या प्रकारानं खळबळ उडाली.
US Mass Shooting: अमेरिकेच्या इंडियानॅपोलीसमधील गोळीबाराची घटना ताजी असतानाच ओक्लोहोमा राज्यात आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. ओक्लोहोमा राज्यातील टल्सा शहरातल्या रुग्णालयाबाहेर एका हल्लेखोरानं अंदाधुंद गोळीबार केला आहे. या दुर्घटनेत हल्लेखोरासह 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यातच अमेरिकेत गोळीबाराच्या 233 घटना समोर आल्या आहेत.
ओक्लोहोमा राज्यातील टल्सा शहरातल्या रुग्णालयाबाहेर हल्लेखोर आला आणि त्यानंतर त्यानं गोळीबार सुरु केला. सेंट फ्रांसिस हॉस्पिटलबाहेर अचानक झालेल्या या प्रकारानं खळबळ उडाली. हल्लेखोराच्या हल्ल्यात पाच जणांना जीव गमावावा लागला. नंतर पोलिसांनी हल्लेखोराला ठार केलं. या घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
टेक्सासमधील घटना ताजी असताना दुसरी घटना
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या टेक्सासमधील शाळेत एका तरुणानं अंधाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक मुलं गोळीबारात जखमी झाली होती. हल्लेखोर तरुण 18 वर्षांचा होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 18 वर्षीय हल्लेखोर तरुणाचा मृत्यू झाला होता.
अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये एकाच वर्षात तब्बल 45,222 लोकांना आपला जीव गमवावा लागला
अमेरिकेमध्ये गोळीबाराच्या घटनेमुळे एकाच वर्षात तब्बल 45,222 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2020 सालच्या एका अहवालातून स्पष्ट झालं आहे. यामध्येही सरासरी पाहता दर दिवशी अमेरिकेमध्ये 124 लोकांना गोळीबारामुळे जीव गमवावा लागतो. दर तासाचा विचार करता अमेरिकेत 5 लोकांना गोळीबारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गोळीबारामध्ये मृत झालेल्या एकूण संख्येपैकी 54 टक्के लोकांनी आत्महत्या केली आहे. ही संख्या 24,292 इतकी आहे. तसेच 43 टक्के म्हणजे 19,384 इतक्या लोकांची हत्या झाली आहे. 2020 साली झालेल्या 45,222 इतके मृत्यू हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रत्यक्षातील आकडेवारी ही मोठी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
शूटआऊट @Texas, शाळेत हल्लेखोर युवकाकडून अंदाधूंद गोळीबार; 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू