कोरियन पॉप बँड BTS नं घेतली जो बायडन यांची भेट, आशियाई वर्ण भेद मिटवण्यासाठी चर्चा
BTS in White House : कोरियन पॉप बॉय बँड BTS नं व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतली आहे.
BTS Meet Joe Biden : जागतिक स्तरावर सर्वात प्रभावशाली बँड म्हणून ओळख असलेल्या कोरियन बॉय बँड BTS नं अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतली आहे. यांच्यात आशियाई वर्ण द्वेष (Anti Asian Hate) दूर करण्याच्या मुद्द्यावर चर्चा पार पडली आहे. BTS नं त्यांच्या उत्तम संगीताच्या जोरावर भाषेची बंधन मोडतं आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. BTS चे जगभरात अनेक चाहते आहेत. उत्तम संगीत आणि स्वत:वर प्रेम करायला शिकणारा हा बँड आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू लागला आहे.
अमेरिकेमध्ये गेल्या वर्षभरात आशियाई लोकांविरुद्धच्या द्वेषात्मक गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. अमेरिकेत आशियाई लोकांना वाईट आणि अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकार ठोस पाऊल उचलण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने जगभरात प्रसिद्ध के सेनसेशन BTS ची भेट झाली आहे. BTS आणि बायडेन यांच्यातील महत्त्वाची बैठक झाली. BTS हा बँड केवळ संगीत बनवण्यासाठीच नाही तर त्यांच्या संगीतातून समाजातील वेगवेगळे विषय मांडून त्याबाबत जनजागृती करण्यासाठीही ओळखले जातात. त्यांच्या गाण्यांमधून त्यांनी द्वेष दूर करणे, स्वत:वर प्रेम करणे यासारख्या अनेक विषय मांडले आहेत.
It was great to meet with you, @bts_bighit. Thanks for all you’re doing to raise awareness around the rise in anti-Asian hate crimes and discrimination.
— President Biden (@POTUS) June 1, 2022
I look forward to sharing more of our conversation soon. pic.twitter.com/LnczTpT2aL
कोण आहे BTS?
BTS हा एक दक्षिण कोरियाई (Republic of Korea) म्युझिकल बॉय बँड ग्रुप (Kpop Boy Band) आहे. बीटीएस (BTS) म्हणजेच बांगतान बॉईज् (Bangtan Sonyeondan or Beyond the Scene) हा दक्षिण कोरियातील सुप्रसिद्ध बँड आहे. या बँडने कोरियन संगीत आणि कोरियन पॉप (K Pop) संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवलं आहे. या बँडमध्ये सात जणांचा समावेश आहे. यामध्ये किम सोकजिन (Jin Aka Kim Seok-Jin), मिन युंगी (Suga Aka Min Yoongi), जंग होसोक (J Hope Aka Jung Ho-seok), किम नामजून (RM Aka Kim Nam-Joon), पार्क जीमिन (Jimin Aka Park Jimin), किम तेह्युंग (V - Kim Tae-Hyung), आणि जीओन जंगकूक (Jungkook Aka Jeon Jung-kook) यांचा समावेश आहे.
यावेळी बैठकीआधी मीडियासोबत बोलताना BTS नं म्हटलं की, 'आशियाई विरोधी द्वेष गुन्हे आणि भेदभाव वाढण्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद. आम्ही आशियाई विरोधी द्वेष गुन्हे, संस्कृती आणि कला यासह विविध विषयांवर चर्चा करण्यास उत्सुक आहोत.'
इतर बातम्या
- Sriya Lenka: ऑडिशन दिली, ऑनलाईन कोरियन भाषा शिकली, भारताची पहिली के-पॉप स्टार ठरली श्रिया लेंका!
- Samantha Ruth Prabhu : ट्रोलर म्हणाला ‘ती तिच्या कुत्र्या-मांजरासोबत एकटीच मरेल’, सडतोड उत्तर देत समंथा म्हणते...
- Swatantra Veer Savarkar : रणदीप हुडाचा ‘वीर सावरकर’ चित्रपटातील पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला!