एक्स्प्लोर
युद्धखोर उत्तर कोरियाच्या नाकेबंदीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध
उत्तर कोरियाच्या युद्धखोर भूमिकेमुळे त्या देशातील निर्यात आणि तिथल्या नागरिकांना कामासाठी इतर देशात वास्तव्याच्या परवानगीवर निर्बंध घातले गेले आहेत.
न्यूयॉर्क : युद्धखोर उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रसंघानं आता निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. उत्तर कोरियातली निर्यात आणि तिथल्या नागरिकांना कामासाठी इतर देशात वास्तव्याच्या परवानगीवर निर्बंध घातले गेले आहेत.
उत्तर कोरियाच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांवर मर्यादा याव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, इंधन उत्पादनांच्या आयातीवर अद्याप पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली नाही आहे.
विशेष म्हणजे, चीन आणि रशियासह एकूण 15 देशांनी या निर्बंधांना पाठिंबा दिला आहे. आधी जपानच्या भूभागावरुन मिसाईलची चाचणी केल्यानंतर कोरियानं विनाशकारी हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. त्यामुळे संपूर्ण जगात तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, उत्तर कोरियाने नुकतीच अमेरिकेला गुआम शहरावर क्षेपणास्त्र हल्ले करण्याची धमकी दिली होती. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही उत्तर कोरियाला जशास तसे उत्तर देऊ असे स्पष्ट शब्दात सुनावलं होतं.
दुसरीकडे उत्तर कोरियाच्या युद्धखोर भूमिकेला उत्तर कोरियाचे राजदूत देखील पाठबळ देत आहे. उत्तर कोरियाचे राजदूत हान तेई सॉन्ग यांनी अमेरिकेला भेटवस्तू (क्षेपणास्त्र हल्ल्याच्या माध्यमातून) दिल्या पाहिजेत असं म्हंटलं होतं.
तसेच, अमेरिकेला माझ्या देशाकडून अशा भेट वस्तू तोपर्यंत मिळत राहतील, जोपर्यंत ते आम्हाला चिथावणी देणं, किंवा आमच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न बंद करत नाहीत.” असा स्पष्ट शब्दात इशारा दिला होता.
तर उत्तर कोरियाच्या माध्यमांमधूनही किंम जोंग यांच्या युद्धखोर भूमिकेचं समर्थन केलं जात आहे. देशाच्या स्थापना दिनी उत्तर कोरियाने अण्वस्त्रांच्या निर्मितीचं काम हाती घ्यावं, असं आवाहन तिथल्या माध्यमांनी केलं होतं.
संबंधित बातम्या
अण्वस्त्र निर्मिती सुरु करा, उत्तर कोरियाच्या मीडियाचं आवाहन
…त्या माध्यमातून अमेरिकेला भेटवस्तू दिली, उत्तर कोरियाची धमकी
उत्तर कोरियाच्या किम जोंगचे 20 क्रूर कारनामे
उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी, जगात चिंतेचं वातावरण
…तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प
उत्तर कोरियाने जपानवरुन मिसाईल सोडलं, दोन्ही देशात तणाव
उत्तर कोरियासंदर्भातील ट्विटवरुन चिनी मीडियाची ट्रम्प प्रशासनावर आगपाखड
उत्तर कोरिया: बैठकीत लागली डुलकी, संरक्षण मंत्र्याना धाडलं यमसदनी!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement