Ukraine Drone attack on Russia: भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या रशियाला सायकॉलॉजिकल वॉरमध्ये युक्रेनचा झटका, नेमकं काय झालं?
Ukraine Drone attack on Russia: युक्रेनच्या ऑपरेशन वेबमध्ये रशियाच्या अतिमहागड्या विमांनाचा कोळसा, एका विमानाची किंमत 3000 कोटी. रशियाची अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली सर्व विमाने नष्ट

Ukraine Drone attack on Russia: युक्रेनने रविवारी रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. युक्रेनने सर्व शक्तीनिशी केलेल्या या ड्रोन हल्ल्यात रशियाची (Russia) तब्बल 41 लढाऊ विमाने (Fighter Jets) नष्ट झाली आहेत. युक्रेनचा रशियावर आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. युक्रेनने (Ukraine) राबवलेल्या ऑपरेशन स्पायडर वेबमध्ये रशियाच्या भूभागात हजारो किलोमीटर आतमध्ये जाऊन पाच प्रमुख हवाई तळांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये रशियन सैन्याच्या बेलाया, ओलेन्या, ड्यागिलेवो, इव्हानोवो आणि उक्रैनका या महत्त्वाच्या हवाई तळांचा समावेश आहे.
गेल्या 18 महिन्यांपासून युक्रेनकडून या ड्रोन हल्ल्यासाठी योजना आखली जात होती. युक्रेनने 40 ट्रक्समधून 117 आत्मघातकी ड्रोन्स रशियाच्या हवाई तळापर्यंत नेले. ट्रकमधील लाकडी छतांमध्ये ड्रोन्स लपवण्यात आले होते. नियोजित हल्ल्याच्या दिवशी रिमोट कंट्रोलने ट्रकमधील केबिनची दारं उघडून हे ड्रोन्स बाहेर काढण्यात आले. त्यानंतर थेट रशियाच्या हवाई तळांवर ड्रोन हल्ला झाला. युक्रेनने केलेल्या दाव्यानुसार हल्ल्यात रशियाची 41 लष्करी विमाने नष्ट किंवा खराब झाली आहेत. यामध्ये Tu-95, Tu-22M3 आणि A-50 यासारख्या क्षेपणास्क्ष डागणाऱ्या विमानांचा समावेश आहे
युक्रेनने केलेल्या या हल्ल्यामुळे बलाढ्य रशियासारख्या देशाचं मोठं नुकसान झालं आहे. सुरुवातीला रशिया आणि युक्रेन युद्धाला सुरुवात झाली तेव्हा युक्रेन फार दिवस टिकाव धरणार नाही, असे बोलले जात होते. मात्र, तीन वर्ष उलटल्यानंतरही युक्रेन तग धरुनच नव्हे तर रशियाला तोडीस तोड प्रत्युत्तर देताना दिसत आहे. त्याचबरोबर युक्रेनने रशिया सारख्या देशांच्या सीमेमध्ये 1000 किलोमीटर प्रवेश करून हल्ला केल्यानं सायकॉलोजीकल वॉरमध्ये रशियाला झटका दिल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळातील ड्रोन आधारित युद्धामुळे मोठ्या देशांची डोकेदुखी वाढली आहे.
G 7 Summit India: भारताला जी-7 संमेलनाचं निमंत्रण नाही, चर्चांना उधाण
जी 7 देशाच्या संमेलनाचं भारताला अद्यापपर्यंत आमंत्रण मिळालेलं नाही. सहा वर्षात पहिल्यांदाच भारताला या संमेलनाला आमंत्रित करण्यात आलेले नाही. 15 जून ते 17 जूनला कॅनडाच्या अल्बर्ट येथे जी 7 देशाचं संमेलन भरणार आहे. भारत आणि कॅनडाचे 2023 पासून खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर यांची हत्या झाल्यापासून दोनही देशांचे संबंध बिघडले असल्यानं भारताला आमंत्रण नसल्याचे चर्चा रंगली आहे.सदस्य नसलेल्या देशांपैकी दक्षिण आफ्रिका, युक्रेन, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील या देशांना आमंत्रित केल्याची माहिती समोर आली आहे. तर कॅनडा , फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि अमेरिका हे देश जी-7 गटातील सदस्य देश आहेत.
आणखी वाचा
युक्रेनच्या ऑपरेशन वेबमध्ये रशियाच्या अतिमहागड्या विमांनाचा कोळसा, एका विमानाची किंमत 3000 कोटी
41 विमानांच्या बदल्यात संपूर्ण युक्रेनच उडवण्याची क्षमता, रशियाकडची महासंहारक क्षेपणास्त्रे कोणती?























