Russia Ukraine War : 41 विमानांच्या बदल्यात संपूर्ण युक्रेनच उडवण्याची क्षमता, रशियाकडची महासंहारक क्षेपणास्त्रे कोणती?
Russia Ukraine War : युक्रेनने 'ऑपरेशन वेब'च्या माध्यमातून रशियन हवाई तळांवर हल्ला करुन 41 विमानं नष्ट केली. रशिया आता त्याला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे.

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता घातक स्थितीकडे जाण्याची शक्यता असून जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र आहे. युक्रेनने नुकतंच रशियावर ड्रोन हल्ला केला असून (Ukraine massive drone attack on Russia) त्यामध्ये रशियाची 41 महागडी विमानं नष्ट झाली आहेत. त्याला आता रशिया जशास तसं उत्तर देण्याची शक्यता आहे. रशियाकडे अशी महासंहारक अस्त्रे आहेत की ज्यामुळे युक्रेनचा एका क्षणात घात होऊ शकतो. त्यामुळे जग आता चिंतेच्या छायेत असल्याचं दिसून येतंय.
युक्रेनच्या 'ऑपरेशन वेब'ने बलाढ्य रशियाला एक मोठा धक्का दिला. युक्रेनने रशियातील प्रमुख हवाई तळांवर हल्ला केला आणि त्यामध्ये रशियाची 41 महागडी विमानं नष्ट झाल्याची माहिती आहे. रशियाची ही विमानं अणवस्त्र वाहून नेणारी होती आणि एका विमानाची किंमत ही जवळपास तीन हजार कोटी रुपये इतकी होती अशी माहिती आहे. युक्रेनच्या या हल्ल्याला रशिया आता महासंहारक अस्त्रांनी उत्तर देण्याची शक्यता आहे.
रशियाकडे अनेक सुपर वेपन्स आहेत. त्यात अवंगार्ड, पोसायडॉन, सरमत आणि बुरेव्हेस्टनिक यांचा समावेश आहे. ही अशी क्षेपणास्त्रे आहेत जी कोणत्याही चुकीशिवाय क्षणार्धात लक्ष्य भेदण्याची क्षमता ठेवतात. रशियाने अद्याप युक्रेनविरुद्ध त्यांचा वापर केलेला नाही.
Russia's Most Deadly Missiles : रशियाची सर्वात घातक क्षेपणास्त्रे -
Kh-47M2 किंझल - हे रशियाच्या सर्वात धोकादायक शस्त्रांपैकी एक आहे. किंझल हे एक हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे लढाऊ विमानातून सोडले जाते. त्याची रेंज 2000 किलोमीटर आहे. त्याच वेळी, वेग 12,348 किलोमीटर प्रति तास आहे.
RS-28 सरमत - हे एक आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याची रेंज 18,000 किलोमीटर आहे. त्यात 10 ते 15 अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.
अवंगार्ड हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकल - हे रशियाच्या सर्वात घातक क्षेपणास्त्रांपैकी एक मानले जाते. त्याचा वेग मॅक 27 म्हणजेच सुमारे 32,200 किलोमीटर प्रति तास आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारमध्ये येत नाही.
9M730 बुरेव्हेस्टनिक - हे अणुऊर्जेवर चालणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ते हजारो किलोमीटर अंतर कापू शकते असा दावा केला जातो. त्याला फ्लाइंग चेर्नोबिल असेही म्हणतात.
रशियाने या आधी क्षेपणास्त्रे का वापरली नाहीत?
ICANW च्या अहवालानुसार, रशियाकडे 5449 अण्वस्त्रे आहेत. परंतु तो अद्याप युक्रेनविरुद्ध कोणतेही मोठे शस्त्र वापरू शकलेला नाही. याची अनेक कारणे आहेत. जर रशियाने युक्रेनविरुद्ध घातक क्षेपणास्त्रे वापरली तर त्याच्यावर जागतिक दबाव वाढू शकतो. अमेरिकाही त्याच्याविरुद्ध उभी राहू शकते.
ही बातमी वाचा:
























