'या' देशात मिळणार दोनपेक्षा अधिक विक ऑफ, काही दिवसच करावं लागणार काम
संयुक्त अरब अमिरातीत (UAE) विक ऑफमध्ये (Week Off) बदल करण्यात आला आहे. आता येथील आठवडा साडेचार दिवसाचा असेल.
अबू धाबी : कोणत्याही काम करणार्या कर्मचार्यांसाठी विकऑफ (Week Off) हा सर्वात आरामदायी दिवस असतो. वेगवेगळ्या देशांतील वेगवेगळ्या कंपन्यांचे कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे नियम आहेत. कुणाच्या नशिबात एक तर कुणाच्या नशिबात दोन ऑफ येतात. जर तुम्हांला आठवड्यातून दोन दिवसांपेक्षा जास्त सुट्टी मिळाली तर तुम्हाला कसे वाटेल? संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) आता वीक ऑफसाठीचे नियम बदलण्यात येणार आहेत. यूएईमध्ये कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून केवळ साडेचार दिवस काम करावे लागणार आहे. युएईने मंगळवारी यासंदर्भातील घोषणा केली आहे. हे नवे नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत. यानुसार कर्मचाऱ्यांचा वीकेंड शुक्रवार दुपारपासून सुरु होईल आणि शनिवार आणि रविवारपर्यंत असा असेल. आतापर्यंत UAE मध्ये वीकेंड हे शुक्रवार आणि शनिवारी असायचे, ते आता शुक्रवार दुपारपासून शनिवार आणि रविवारी असा असेल. UAE च्या मंत्रालय-स्तरीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षापासून साडेचार दिवसांचा आठवडा असेल.
खाजगी कर्मचाऱ्यांच्या विक ऑफ कंपनीवर अवलंबून
हा नियम खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लागू होईल की नाही याबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. खाजगी कंपन्यांना सरकारी विभागांच्या धर्तीवर त्यांच्या कामकाजाचा आठवडा बदलण्यास मोकळीक आहे. मुस्लिम कामगार शुक्रवारची नमाज अदा करतात. म्हणूनच बहुतेक मुस्लिम देशांमध्ये हा दिवस सुट्टीचा असतो. एक निवेदन जारी करुन, सरकारने शनिवार आणि रविवारच्या बदलाबाबत माहिती दिली आहे.
वीकेंड का बदलला?
वीकेंड बदल्यामुळे शनिवार आणि रविवारी शटडाऊन असलेल्या देशांशी आर्थिक, व्यापार आणि आर्थिक व्यवहार सुनिश्चित होतील, असे निवेदनात म्हटले आहे. UAE मधील हजारो कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. अधिकृत निवेदनानुसार शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत काम सुरू राहणार असून त्यानंतर कर्मचारी शुक्रवारची नमाज अदा करू शकतील. हा बदल UAE मधील जीवन संतुलित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- CDS बिपिन रावत यांच्या निधनानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया
- Bipin Rawat Death : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानं शोक; कोण असतील देशाचे पुढचे सीडीएस?
- Bipin Rawat Helicopter Crash : 2015 मध्ये हेलिकॉप्टर क्रॅशमधून सुखरुप बचावले होते बिपिन रावत; काय होती ती दुर्घटना?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha