(Source: Poll of Polls)
Corona New Varient : ओमिक्रॉनपेक्षाही धोकादायक आहे नवा BF.7 व्हेरियंट, 'ही' लक्षणे दिसल्यास सावध व्हा
Omicron : ओमिक्रॉनचा नवीन व्हेरियंट आढळून आला आहे. हा BF.7 सबव्हेरियंट धोकादायक असून कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
BF.7 New Varient : कोरोनाच्या नव्या सब-व्हेरियंटने (Corona Sub-Varient) चिंता वाढवली आहे. कोरोनाचा (Coronavirus) धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. याआधी कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटने चिंता वाढवली होती. सध्या त्याचा धोका कमी झाला आहे. पण आता त्याच्या नवीन उपप्रकाराने डोकं वर काढलं आहे. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा नवा सबव्हेरियंट BF.7 आणि BA.5.1.7 यांमुळे पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. हिवाळ्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
BF.7 आणि BA.5.1.7 चे नवीन व्हेरियंट
शास्त्रज्ञांना ओमिक्रॉन दोन नवीन सबव्हेरियंट BF.7 आणि BA.5.1.7 आढळून आले आहेत. हे व्हेरियंट चीनमध्ये आढळून आले आहेत. कोरोनाचे नवे सबव्हेरियंट BF.7 आणि BA.5.1.7 ओमिक्रॉनपेक्षा अधिक धोकादायक आणि संसर्गजन्य असल्याचा धोका वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. त्यातच आता हवामान बदलाचा काळ आहे. गुलाबी थंडीची चाहूल लागताना कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. चीनमधील ग्वांगडोंग प्रांतातील शाओगुआन शहरात B.5.1.7 आणि शाओगुआन आणि यांताई शहरांमध्ये BF.7 ची प्रकरणे आढळली आहेत.
New weekly US genomic surveillance https://t.co/jjl2AnwOWX
— Eric Topol (@EricTopol) October 7, 2022
BA.5 continues to fade as BA.2.75x creeps up, BF.7 (BA.5.2.1.X) & BA.4.6 gain
Compare w/ new UK report today, via @kallmemeghttps://t.co/533dHM1x5v
Main difference is BE.1.1 (->BQ.1.1) w/ significant growth advantage pic.twitter.com/BU48SUuRNL
काय आहे BF.7?
चीनच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, BF.7 हा प्रकार ओमिक्रॉन व्हेरियंटच्या BA.5 चा सबव्हेरियंट आहे. हा व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्तीलाही चकवा देत असल्याने अधिक संसर्गजन्य आहे.
चिनी शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, BA.5.1.7 आणि BF.7 उपप्रकार अत्यंत संसर्गजन्य आणि अधिक धोकादायक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Omicron च्या BF.7 प्रकारांबाबत आधी धोक्याचा इशारा दिला होता. चीनमध्ये आढळलेले हे नवीन व्हेरियंट बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, डेनमार्क आणि इंग्लंड मध्येही पसरताना दिसत आहे.
'ही' लक्षणे दिसल्यास सावध व्हा
- घसा खवखवणे
- डोकेदुखी
- खोकला
- नाक चोंदणे
- सर्दी
- शिंकणे
- घोगरा आवाज
- थकवा
- अंगदुखी
महत्त्वाच्या इतर बातम्या
- भारतीय शास्त्रज्ञांचे मोठे यश, कोरोनाच्या व्हेरियंटविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीजचा शोध
- Heart Attack : काळजी घ्या! कोरोनानंतर वाढतोय हृदयविकाराचा धोका, डॉक्टरांनी सांगितलं 'हे' कारण
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )