(Source: Poll of Polls)
Heart Attack : काळजी घ्या! कोरोनानंतर वाढतोय हृदयविकाराचा धोका, डॉक्टरांनी सांगितलं 'हे' कारण
Heart Problems After Covid : कोरोनाकाळानंतर लोकांमध्ये हदयविकारांचं (Heart Attack) प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. हार्ट अटॅकच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
Heart Problems After Covid19 : कोरोनाकाळानंतर (Coronavirus) लोकांमध्ये हदयविकारांचं (Heart Attack) प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. हार्ट अटॅकच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अलिकडेच गरबा (Garba) खेळतानाही काही जणांचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. गरबा (Dandiya) खेळत असताना आतापर्यंत हृदयविकाराच्या धक्क्याने (Heart Attack) काही जणांचा मृत्यू झाला आहे. गरबा खेळताना आतापर्यंत देशातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये राज्यातील चार जणाचा समावेश असून मुंबईत दोघांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या मते, वाढत्या हदयविकाराचं कारण म्हणजे सध्याची लाईफस्टाईल आणि कोरोना संक्रमण (Coronavirus Effect) आहे. कोरोना संक्रमणामुळे हदय कमकुवत होतं असल्याचं तज्ज्ञांचं मतं आहे. याबाबत सविस्तर माहिती वाचा.
कोरोना संसर्गानंतर हदयविकाराचा धोका वाढता
हदयविकाराचं (Heart Attack) मुख्य कारण म्हणजे तणाव (Stress/Tension) , लठ्ठपणा (Obesity) , उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि खाण्या-पिण्याची ही यामागची कारण आहेत. याशिवाय कोरोना संसर्गाचाही यावर परिणाम होत आहे. कोरोना विषाणू हदयासह शरीराच्या विविध भागांवर परिणाम करतो, यामुळे तुमचं शरी कमकुमत होतं. कोरोनामुळे फुफ्फुसं आणि हदयावर वाईट परिणाम होतो, त्यामुळे कोरोना संसर्गानंतरही हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे.
कोरोना विषाणूचा हदयावर काय परिणाम होतो?
डॉ. गुप्ता यांच्या मते कोरोना विषाणू हदयावरही परिणाम करतो. सुरुवातील कोरोना विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करत होता. मात्र कोरोना विषाणूमुळे फुफ्फुसांना कमी ऑक्सिजन पुरवठा झाला, परिणामी हदयालाही कमी ऑक्सिजन पुरवठा झाला. ज्या रुग्णांना कोरोना संसर्ग झाला त्या रुग्णांच्या हदयाची कार्यक्षमताही (रक्त शुद्ध करून शरीराच्या विविध भागात पोहोचवण्याची क्षमता/पंपिंग कॅपॅसिटी) कमी झाली, अशा लोकांना हदयाविकाराचा धोका असतो.
हृदयविकाराची लक्षणे
- हदयाचे ठोके अचानक जलद किंवा मंद होणे
- छाती दुखणे
- श्वासोच्छवास करण्यात समस्या येणे
- छातीत जड वाटणे
- घाम येणे
- अस्वस्थ वाटणे
- छातीत दुखणे डावीकडील बाजूला दुखणे
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Navratri 2022 : गरबा खेळताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यूंमध्ये वाढ, राज्यात चार तर मुंबईत दोन युवकांचा मृत्यू
- Hypertension and Heart Attack : वेळेवर उपचार न घेणं हे 70 टक्के हृदयविकाराच्या झटक्याचं कारण; न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स पॅनलच्या तज्ज्ञांचा दावा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )