Twitter New Rules: एलॉन मस्क यांची मोठी घोषणा, आता Twitter वर दिवसाला वाचता येणार फक्त 600 पोस्ट
Twitter New Rules: डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिप्युलेशनमुळे इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे.
Twitter: इलॉन मस्क (Elon Musk) यांनी विकत घेतल्यापासून ट्विटर (Twitter) कायम चर्चेत राहिलं आहे. आता इलॉन यांनी ट्विटरशी संबंधित आणखी एक मोठी घोषणा केली आहे. आता ट्विटरवर दिवसाला पोस्ट वाचण्यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. ट्विटरवर पोस्ट वाचण्यावर सध्या तात्पुरत्या मर्यादा घालण्यात आल्या आहे. डेटा स्क्रॅपिंगमुळे हा कठोर निर्णय घेतला असल्याचे इलॉन मस्क यांनी सांगितलं आहे.
एलॉन मस्क यांनी शनिवारी ट्विट करत ही घोषणा केली आहे. घोषणा करतान एलॉन मस्क म्हणाले, डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिप्युलेशनमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. ट्विटर व्हेरीफाईड अकाऊंट (ब्लू टिक असणारे यूजर) यांना दिवसाला सहा हजार पोस्ट वाचता येणार आहे. तर अनव्हेरिफाईड अकाऊंट ( ब्लू टिक नसणारे यूजर) यांना दिवसाला 600 पोस्ट वाचता येणार आहे. तर नव्याने ज्यांनी अकाऊंट उघडले आहेत अशा अनव्हेरिफाईड अकाऊंटसला दिवसाला 300 पोस्ट वाचता येणार आहे.तसेच एलॉन मस्क यांनी ही लवकरच या मर्यादेत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
To address extreme levels of data scraping & system manipulation, we’ve applied the following temporary limits:
— Elon Musk (@elonmusk) July 1, 2023
- Verified accounts are limited to reading 6000 posts/day
- Unverified accounts to 600 posts/day
- New unverified accounts to 300/day
डेटा स्क्रॅपिंगमुळे मस्क यांनी हा दुसरा निर्णय घेतला आहे. आता ट्विटर पाहण्यासाठी तुम्हाला लॉग-इन करणे बंधनकारक आहे. ट्विटर अकाउंट नसेल तर तुम्हाला ट्विटर ब्राऊज करता येणार नाही. ट्विटरवरून डेटाची चोरी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी त्यांनी हा निर्णय घेतला. एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून सातत्यानं नवनवीन बदल ते करत आहेत. त्यांनी अनेकदा सांगितलंय की, ट्विटरला तोट्यातून बाहरे काढण्याच्या दृष्टीनं ते प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. आतापर्यंत त्यांनी ट्विटर युजर्ससाठी अनेक नवे फिचर्सही लॉन्च केले आहेत. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने युजर्सना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे.
ट्विटरच्या या निर्णयामुळे अनेक मोठ्या कंपन्यांना देखील हा नियम लागू असल्याने आता सर्वांचीच चिंता वाढल्याचं दिसतंय.देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सर्वत्र रेट लिमिट लागू करण्यात आले आहे त्यामुळे ट्विट करण्यात तसेच इतरांचे ट्विटर अकाऊंटला फॉलो करण्यात अडचणी येत आहे.
हे ही वाचा :