एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुर्कीत विमानतळावर आत्मघाती हल्ला, 36 जणांचा मृत्यू
इस्तंबुल : तुर्कीमधील इस्तंबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यात जवळपास 36 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून दीडशेहून अधिक जण जखमी झालेत.
तुर्कस्तानच्या स्थानिक वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी हा हल्ला झालाय. विमानतळावर तीन आत्मघाती हल्ले करण्यात आले. त्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. हा हल्ला दहशतवादी संघटना आयसिसनं केल्याची शक्यता तुर्की सरकारनं वर्तवली आहे.
इस्तंबुल विमानतळावरुन मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक होते. हल्ल्यातील मृतांचा आकडा 50 पर्यंत वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एके 47 घेऊन आलेल्या दहशतवाद्यांनी विमानतळाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांवर सुरुवातीला गोळीबार केला. त्यानंतर तीन आत्मघाती स्फोट घडवून आणले. अचानक झालेल्या स्फोटांमुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाल्याचंही म्हटलं जातं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement