एक्स्प्लोर

Parag Agrawal salary : वय अवघं 37 वर्ष, ट्विटरच्या CEO पदी वर्णी, पराग अग्रवाल यांचा पगार किती?

Parag Agrawal Salary: जॅक डोर्सी यांनी ट्वीटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिल्यानंतर पराग अग्रवाल यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे.

Parag Agrawal Salary: जॅक डोर्सी यांनी ट्वीटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिल्यानंतर 37 वर्षीय पराग अग्रवाल यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे. पराग अग्रवाल यांनी बॉम्बे आयआयटीमधून शिक्षण घेतलं आहे. पराग अग्रवाल यांनी 2011 मध्ये ट्वीटर कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 2017 मध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) या पदावर त्यांची निवड झाली. त्यानंतर आता पराग यांची कंपनीच्या सीईओपदी निवड झाली आहे. पराग अग्रवाल यांच्या कामावर जॅक डोर्सी समाधानी होते. त्यांनी अग्रवाल यांचं नाव सीईओ पदासाठी पुढे केल्याचं समजतेय. कंपनीनं यूएस सिक्युरिटीज अण्ड एक्सचेंज कमिशन (U.S. Securities and Exchange Commission) ला दिलेल्या माहितीनुसार, पराग अग्रवाल यांना वार्षिक एक मिलियन डॉलरचं (7,50,54,500 रुपये) पॅकेज आणि बोनस देण्यात येणार आहे. बोनसशिवाय पराग यांना 12.5 मिलियन रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिटही मिळणार आहेत. रिस्ट्रिक्टेड स्टॉक हे कामाच्या मुल्यमापनाच्या आधारावर दिले जाणार आहेत. याची सुरुवात एक फेब्रुवारी 2022 पासून होणार आहे.  

2011 पासून पराग अग्रवाल ट्वीटर कंपनीमध्ये Distinguished Software Engineer म्हणून काम सुरु केलं होतं. 2017 मध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) या पदावर त्यांची निवड झाली. त्यानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कंपनीने त्यांची नियुक्ती केली आहे. पराग अग्रवाल लवकरच पदभार स्वीकरणार आहेत. जगभरातील मोठ्या तंत्रज्ञानाविषयक कंपन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीय आहेत. यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, ‘अ‍ॅडोब’चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचेही नाव आता या यादीत जोडलं गेलेय.  

पराग अग्रवाल यांनी याआधी कुठे केलेय काम – 
भारतात जन्मलेल्या पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बेमधून पदवी घेतली आहे. ट्वीटरशिवाय त्यांनी याहू, माइक्रोसॉफ्ट आणि AT&T यासारख्या दिग्गज कंपनीमध्ये काम केलं आहे. 

पराग अग्रवाल यांचं शिक्षण –
पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बे येथून बीटेकचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून  कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडीचं शिक्षण घेतलं आहे.

संपत्ती किती आहे?
पीपलएआयनुसार पराग अग्रवाल यांची एकूण संपत्ती 1.52 मिलिअन डॉलर इतकी आहे.  

जॅक डॉर्सींच्या राजीनाम्यानंतर अग्रवाल यांचं ट्वीट - 
जॅक डोर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्वीट केलं. आपल्या ट्वीटमध्ये अग्रवाल यांनी जॅक आणि संपूर्ण टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संपूर्ण जग आपल्याकडे पूर्वीपेक्षाही अधिक अपेक्षेने पाहत आहे. आपण ती अपेक्षापूर्ती करूया, असेही आपल्या ट्वीटमध्ये अग्रवाल यांनी म्हटले आहे.

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षणVinod Kambli Raj Thackeray : दोन मिनिटं थांबले, राज ठाकरे विनोद कांबळींना आवर्जून भेटलेVinod Kambli Achrekar Sir :सर जो तेरा चकराये..कांबळीनं गायलं आचरेकरांचं आवडतं गाणं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget