एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
100 जणांसह प्रवास करणारी बोट बँकॉकमध्ये नदीत बुडाली
बँगकॉक : शंभर जणांसह प्रवास करणारी बोट बुडून थायलंडच्या बँकॉकमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये किमान 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अनेक जण बेपत्ता आहेत.
रविवारी बँकॉकमधल्या केओ फ्राया रिव्हरमध्ये ही बोट बुडून दुर्घटना घडली. 30 पेक्षा अधिक प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र अपघातात किती जण बेपत्ता आहेत, याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे.
रविवारी दुपारी या बोटीची कुठल्यातरी वस्तूशी धडक झाल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. धार्मिक कार्यासाठी प्रवास करणाऱ्या मुस्लिम थाई नागरिकांचा मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी स्थानिक मीडियाला दिली आहे.
बोटीची प्रवासी क्षमता 50 इतकी असतानाही दुप्पट प्रवासी भरल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातग्रस्तांमध्ये परदेशी नागरिक असल्याची शक्यता नाकारली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement