एक्स्प्लोर

Benjamin Netanyahu : 'होय, माझे मित्र पंतप्रधान मोदींचा मला फोन आला होता'; बेंजामिन नेत्यानाहूंनी मानले भारताचे आभार, नेमकं काय म्हणाले?

बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, इराणचा अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम संपूर्ण जगासाठी धोका आहे आणि इस्रायली सैन्याच्या कारवाईचा उद्देश केवळ इस्रायलचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे रक्षण करणे आहे.

Benjamin Netanyahu PM Modi : इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. दरम्यान, सोमवारी (2 मार्च 2026) पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्याशी सध्याच्या परिस्थितीबद्दल संपर्क करत संवाद साधला. बेंजामिन नेतन्याहू यांनी सोमवारी बेट शेमेशला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला, जिथे इराणच्या (US-Iran Tensions) बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. अशातच पत्रकारांशी बोलताना नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींच्या फोन कॉलचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की ते इतर देशांच्या नेत्यांशीही संपर्कात आहेत.

Benjamin Netanyahu PM Modi : मी माझे मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो

या संदर्भात बोलताना पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले कि, "मी माझे मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो आहे. मी त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली. या काळात इस्रायल आणि यहुदींच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मी त्यांचे आणि भारताचे आभार मानतो." नेतन्याहू यांनी असेही म्हटले की त्यांनी फोनवर काय चर्चा केली ते ते उघड करणार नाहीत, परंतु त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं कि, पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की त्यांनी नेतन्याहू यांना अलीकडील परिस्थितीबद्दल भारताच्या चिंता कळवल्या आणि नागरिकांची सुरक्षा सर्वोपरि असली पाहिजे यावर भर दिला.

या दरम्यान, बेंजामिन नेतान्याहू यांनी असेही सांगितले की, इराणचे अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम संपूर्ण जगासाठी धोका निर्माण करतात आणि इस्रायली सैन्याच्या कृती केवळ इस्रायलचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे रक्षण करण्यासाठी आहेत. नेतान्याहू म्हणाले, "ऑपरेशन रोअरिंग लायनचा हा तिसरा दिवस आहे. इस्रायली सैन्य आणि इस्रायली सरकारने, आमचे मित्र अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सहकार्याने, इस्रायलला असलेला अस्तित्वाचा धोका आणि अमेरिका आणि संपूर्ण जगाला असलेले मोठे धोके नष्ट करण्यासाठी ही कारवाई सुरू केली आहे."

Benjamin Netanyahu : इराणचे धोके केवळ इस्रायल आणि अमेरिकेपुरते मर्यादित नाहीत, तर....

नेतान्याहू म्हणाले की, इराणचे धोके केवळ इस्रायल आणि अमेरिकेपुरते मर्यादित नाहीत तर ते युरोप आणि इतर प्रदेशांमध्ये देखील पसरले आहेत. सायप्रसमधील ब्रिटीश लष्करी तळावर इराणने केलेल्या हल्ल्याचा संदर्भ देत ते म्हणाले, "ते मोठ्याने घोषणा देत आहेत: 'इस्रायल मुर्दावाद, अमेरिका मुर्दावाद.' ते त्यांचे अंतिम ध्येय आहे, परंतु मी म्हटले होते की ते हस्तक्षेप करणाऱ्यांनाही लक्ष्य करतील. ते युरोपला लक्ष्य करतील आणि त्यांनी तसे केले. ते म्हणाले, "जर या दहशतवादी राजवटीने... अण्वस्त्रे आणि त्यांचा वापर करण्याचे साधन, बॅलिस्टिक आणि आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे मिळवली तर ती संपूर्ण जगाला धोका निर्माण करेल." म्हणून आपण स्वतःचे रक्षण करण्याचा संकल्प केला आहे, पण असे करताना आपण इतरांचेही रक्षण करत आहोत."

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
Us Israel vs Iran War: जंग जंग पछाडून, नेतृत्व 24 तासात संपवूनही इराणमध्ये सत्तापालट शक्यच नाही! अमेरिकन गुप्तचर अहवालाने ट्रम्प कात्रीत
जंग जंग पछाडून, नेतृत्व 24 तासात संपवूनही इराणमध्ये सत्तापालट शक्यच नाही! अमेरिकन गुप्तचर अहवालाने ट्रम्प कात्रीत
Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget