एक्स्प्लोर
Advertisement
काबुल विद्यापीठाबाहेर बॉम्बस्फोट, 25 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आत्तापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आत्तापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
अली अब्द रुग्णालय आणि काबुल विद्यापीठाजवळ आज दुपारच्या सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटात जवळपास 25 जणांचा जागीच मृत्यू झाला. हा स्फोट शिया धार्मिक स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाला. स्फोटानंतर परिसरात पोलिसांनी नाकेबंदी केली आहे.
सध्या या हल्लाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये आज ‘नौरोज’ मोठ्या उत्साहात साजरं होतं. पारशी आणि शिया धर्मीय हा उत्सव साजरा करतात. ‘नौरोज’ हा सण इराणी लोकांचं नववर्ष म्हणून साजरा होतो. दुसरीकडे 17 मार्च रोजी राजधानी काबुलमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. या स्फोट तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर चारजण गंभीर जखमी झाले होते.3 killed, 7 wounded in a blast close to Ali Abad Hospital and Kabul University: Afghanistan Media
— ANI (@ANI) March 21, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement