Sweden First Female PM : स्वीडनच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचा नियुक्तीनंतर काही तासांनी राजीनामा, नक्की काय घडलं?
Sweden First Female PM : स्वीडनच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनणाऱ्या मॅग्डालेना अँडरसन यांना अवघ्या काही तासांनंतरच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
Sweden First Female PM : स्वीडनच्या (Sweden) पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला मॅग्डालेना अँडरसन (Magdalena Andersson) यांना नियुक्तीनंतर अवघ्या काही तासांनंतरच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
Sweden First Female PM : स्वीडनच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनणाऱ्या मॅग्डालेना अँडरसन यांना अवघ्या काही तासांनंतरच पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. मॅग्डालेना अँडरसन यांची बुधवारी पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. मात्र, मित्र पक्षांनी सरकारची साथ सोडल्यानं अँडरसन यांचा अर्थसंकल्प मान्य होऊ शकला नाही आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.
मॅग्डालेना अँडरसन यांनी स्वीडनच्या 100 वर्षांच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान बनण्याचा मान मिळवला. 54 वर्षीय सोशल डेमोक्रॅट पक्षाच्या नेत्या मॅग्डालेना अँडरसन यांचं पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर संसदेत टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन करण्यात आलं होतं.
मॅग्डालेना अँडरसन यांची पंतप्रधानपदी नियुक्ती कशी झाली?
स्वीडनच्या 349 सदस्यीय संसदेत 117 सदस्यांनी अँडरसनच्या बाजूने तर 174 सदस्यांनी विरोधात मतदान केले. अशा परिस्थितीत स्वीडनच्या कायद्यानुसार बहुसंख्य खासदार एखाद्या उमेदवाराच्या विरोधात नसतील. तर, त्या उमेदवाराची पंतप्रधानपदी नियुक्त केले जाऊ शकते. त्यामुळेच अँडरसन यांची पंतप्रधानपदासाठी निवड झाली.
अँडरसन यांचा राजीनामा मिळाल्याचं संसदेच्या अध्यक्षांनी सांगितलंय. पुढील निर्णयासाठी पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
मॅग्डालेना अँडरसन यांनी राजीनाम्यावर काय प्रतिक्रिया दिली?
'आपल्याला अशा सरकारचं नेतृत्व करायचं नाही ज्याच्या संविधानिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात.' त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं अँडरसन यांनी म्हटलं. पुन्हा नवं सरकार स्थापन करुन पंतप्रधान होण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मॅग्डालेना अँडरसन यांची राजकीय कारकिर्द :
अँडरसन यांनी 1996 साली तत्कालीन पंतप्रधान गोरान पर्सन यांच्या राजकीय सल्लागार म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
अँडरसन यांनी मागील सात वर्षे अर्थमंत्री पदाची धुरा सांभाळलीय.
महत्त्वाच्या बातम्या :
इंग्लिश खाडीत बोट बुडाली; 31 निर्वासित ठार
Bulgaria Accident : बल्गेरियात पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात, 15 मुलांसह 46 जणांचा होरपळून मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha