Viral Video : 'गार्लिक म्हणजे आलं', पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांची अजब 'माहिती'; सोशल मीडियावर केलं जातंय ट्रोल
Viral Video : पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
![Viral Video : 'गार्लिक म्हणजे आलं', पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांची अजब 'माहिती'; सोशल मीडियावर केलं जातंय ट्रोल Garlic Matlab Adrak Viral Pakistan information minister Fawad Chaudhry Viral Video : 'गार्लिक म्हणजे आलं', पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांची अजब 'माहिती'; सोशल मीडियावर केलं जातंय ट्रोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/24/7a92ceee8efce147616082914a98dbd9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Viral Video : पाकिस्तानची जनता त्यांच्या अजब-गजब गोष्टींमुळे सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो खुद्द पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्याचा आहे. पाकिस्तानच्या या मंत्र्याला आलं आणि लसून यातील फरक कळत नाहीत. पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी गार्लिक म्हणजे आलं असं म्हटलं आणि शेवटपर्यंत ते यावर ठाम राहिले.
पत्रकार नायला इनायत यांनी सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना नायला इनायत यांनी लिहिलं आहे की, लसून म्हणजे आलं, माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी रोज एक नवीन गोष्ट शिकतात.
पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी हे एक पत्रकार परिषद घेत होते. या दरम्यान ते आलं आणि लसून यामध्ये गोंधळून गेले. त्यांनी म्हटलं की गार्लिक म्हणजे आलं. त्यावेळी अनेकांनी सांगितलं की गार्लिक म्हणजे लसून असतं. तर फवाद चौधरी आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. लोकांनी एवढं सांगितलं तरी फवाद चौधरी म्हणाले की गार्लिक म्हणजे आलं.
"Garlic is adrak," information minister Fawad Chaudhry. One learns a new thing everyday. pic.twitter.com/oXjgey4Kd8
— Naila Inayat (@nailainayat) November 23, 2021
शेवटी लोकांनी अनेकवेळा सांगून झाल्यावर त्यांनी गार्लिक म्हणजे लसून. एका पत्रकार परिषदेच्या वेळी ते महागाईच्या मुद्द्यावर उत्तर देत होते. पण फवाद चौधरी यांना सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं. अनेकजण तर त्यांच्यावर भडकलेच. तर काही जणांनी फवाद चौधरींची बाजू घेऊन अशा चुका होतात असं सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)