Superbug: 2023 वर्ष धोक्याचे? शास्त्रज्ञांची झोप उडाली, कोरोनानंतर आता सुपरबगमुळे मृत्यू तांडवाची भीती!
Superbug: कोरोना महासाथीच्या आजारानंतर आता सुपरबगचा धोका वाढू लागला आहे. सुपरबगमुळे एका वर्षात एक कोटी जणांना प्राणास मुकावे लागू शकते, असे संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Superbug: मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जगात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. कोरोना महासाथीची तीव्रता कमी झाली असली तरी भीतीचे सावट कायम आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे (Coronavirus variant) अनेक देशांची चिंता वाढली आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर फैलावणाऱ्या सुपरबगमुळे (Superbug) जगाची चिंता वाढली आहे.
मागील काही काळापासून सुपरबगमुळे शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग या सुपरबगचा धोका अधिकच वाढवत आहे. मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये या सुपरबगबाबत मोठ्या धोक्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सुपरबगचा फैलाव वेगाने होत राहिल्यास दरवर्षी एक कोटी जणांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती लॅन्सेटमधील शोधनिबंधात व्यक्त केली आहे. सध्या या सुपरबगमुळे दरवर्षी सरासरी 13 लाख जणांचा मृत्यू होत आहे. सुपरबगवर अॅण्टीबायोटिक आणि अॅण्टीफंगल औषधांचाही परिणाम होत नाही. त्यामुळे हा सुपरबग जगासाठी नवा धोका आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सुपरबग काय आहे? (What is Superbug)
सुपरबग हा जीवाणूचा एक प्रकार आहे. काही जीवाणू मानवासाठी चांगले असतात. तर, काही मानवी आयुष्यासाठी धोकादायक असतात. हा सुपरबग मानवांसाठी घातक आहे. सुपरबग हा विषाणू आणि परजीवी यांचा एक प्रकार आहे. जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा परजीवी बदलत जातात, त्यावेळी त्यांच्यावर औषधांचा परिणाम होत नाही.
अॅण्टीमायक्रोबॉयल रेझिस्टेन्स तयार झाल्यानंतर या संसर्गावरील उपचार अधिक कठीण होतात. याचाच अर्थ एखाद्या रुग्णाच्या शरीरात असलेल्या सुपरबगवर उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधे ही निष्प्रभ ठरतात.
कोणत्याही प्रतिजैविक औषधाच्या अतिवापरामुळे किंवा प्रतिजैविक औषधांचा विनाकारण वापर केल्यामुळे सुपरबग्स तयार होतात. डॉक्टरांच्या मते, फ्लूसारख्या विषाणूजन्य संसर्गाच्या बाबतीत अँटीबायोटिक्स घेतल्यास सुपरबग होण्याची शक्यता जास्त असते. त्याचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, भारतात न्यूमोनिया आणि सेप्टिसिमियाच्या उपचारांसाठी वापरण्यात येणारी कार्बापेनेम ही औषधे आता बॅक्टेरियावर कुचकामी ठरली आहेत. त्यामुळे या औषधांच्या निर्मितीवर बंदी घालण्यात आली होती.
हा धोकादायक बग कसा पसरतो?
त्वचेचा संपर्क, जखमा, लाळ आणि लैंगिक संबंधाद्वारे सुपरबगचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत फैलाव होतो. सुपरबग मानवी शरीरात गेल्यावर औषधांचा रुग्णावर परिणाम होणे थांबते. सुपरबगवर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही.
लॅन्सेटने कोरोना महामारीच्या काळात काही दिवसांपूर्वी सुपरबगमुळे झालेल्या मृत्यूंचा अभ्यास केला आहे. अहवालानुसार, 2021 मध्ये, ICMR ने 10 रुग्णालयांमध्ये एक अभ्यास केला आणि असे आढळून आले की, कोरोनानंतर लोकांनी अँटीबायोटिक्सचा वापर वाढवला आहे. कोरोनाची लागण झालेल्या कोविड रुग्णांपैकी 50 टक्क्यांहून अधिक रुग्णांना उपचारादरम्यान किंवा नंतर विषाणू, बुरशीमुळे संसर्ग झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. या अभ्यासानुसार, जगात प्रतिजैविकांचा वापर याच दराने वाढत राहिला तर ती धोक्याची घंटा ठरू शकते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )