एक्स्प्लोर
अमेरिकेत नाईटक्लबमध्ये 15 जणांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

सिनसिनाटी (अमेरिका) : अमेरिकेतील ओहिओ प्रांतातल्या सिनसिनाटी शहरात एका नाईटक्लबमध्ये दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे, तर किमान 15 जण जखमी आहेत. शहराच्या पूर्व भागात असलेल्या कॅमिओ नाईटक्लबमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. रविवारी गजबजलेल्या वेळी झालेल्या गोळीबारामुळे शहरात एकच खळबळ उडाली. हे नियोजित हत्याकांड असल्याच्या वृत्ताला सिनसिनाटी पोलिसांनी पुष्टी दिली आहे, मात्र हल्लेखोरांबाबत कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे हल्लेखोर मोकाट असल्याचं काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. हल्ल्याच्या वेळी उपस्थित असलेल्या, मात्र घाबरुन पळालेल्या नागरिकांना शोधून त्यांची साक्ष नोंदवण्याचं आव्हान पोलिसांपुढे आहे. सिनसिनाटीतील कॅमिओ नाईटक्लब गोळीबार केसवर काम करणाऱ्या पोलिसांनी हे त्यांच्या कारकीर्दीमधील गेल्या वीस वर्षांतलं सर्वात भीषण हत्याकांड असल्याचा दावा केला आहे. https://twitter.com/PaulNeudigate/status/845934474793816064
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























