एक्स्प्लोर

Pakistan : शाहबाज शरिफ दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी, सोमवारी पार पडणार शपथविधी

Pakistan : पीएमएल-एनचे वरिष्ठ नेते शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांची दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. त्यांनी शनिवारी (दि.2) पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता.

Pakistan : पीएमएल-एनचे वरिष्ठ नेते शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांची दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. त्यांनी शनिवारी (दि.2) पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर रविवारी (दि.3) पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पुन्हा एकदा शाहबाज शरीफ(Shehbaz Sharif)  यांचा विजय झालाय. शरिफ यांच्याशिवाय, उमर अयूब खान यांनीही पंतप्रधानपदासाठी अर्ज केला होत. मात्र, रविवारी झालेल्या निवडणुकीत उमर अयुब खान यांना पुरेसा पाठिंबा मिळू शकला नाही. 

सोमवारी होणार शपथविधी सोहळा

पीएमएल-एनने पीपीपी आणि एमक्यूएमसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. शहबाज शरीफ हे एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधानही राहिले आहेत. त्यावेळीही त्यांनी पीपीपीसोबत आघाडी करुन सत्ता स्थापन केली होती. तुरुंगवास भोगत असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे उमेदवार उमर अयुब खान यांना 92 मते मिळाली. यावेळी पीटीआय समर्थक खासदारांनी घोषणाबाजी केली. शाहबाज शरीफ यांचा शपथविधी सोहळा सोमवारी राष्ट्रपती भवनात होणार आहे.

शाहबाज शरीफ यांना किती मतं मिळाली?

पंतप्रधान म्हणून निवडून येण्यासाठी शाहबाज शरीफ यांना 336 सदस्यीय सिनेटमध्ये 169 मतांची गरज होती. शाहबाज शरीफ यांनी हा आकडा सहजरित्या गाठला. पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांचे संयुक्त उमेदवार शाहबाज यांना 336 सदस्यांच्या सभागृहात 201 मते मिळाली. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे 33 वे पंतप्रधान आहेत.

पीएमएल-एनचे प्रमुख नवाझ शरीफ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याच्या आशेने तब्बल चार वर्षांनी पाकिस्तानात परतले. आपल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि ते चौथ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान होतील, अशी आशा नवाझ शरीफ यांना होती. तथापि, 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पीएमएल-एनला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांना 90 पेक्षा जास्त जागा जिंकण्यात यश आले. तर पीएमएल-एनला 75 तर पीपीपीने 54 जागा जिंकल्या.

स्पष्ट बहुमत न मिळाल्याने पीएमएल-एनने बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पीपीपी पक्षासोबत आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तान आणि इस्तेहकाम-ए-पाकिस्तान पार्टीचाही या आघाडीत समावेश आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे 33 वे पंतप्रधान आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

India-China : भारताने चीनचं मार्केट खाल्लं? अमेरिका-ब्रिटनने भारताकडून वस्तू खरेदी करण्यास सुरुवात, चीनला झोंबल्या मिरच्या! 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
Dharmendra : धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,
धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,"सुपरस्टार जोडी"
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujjwal Nikam BJP : उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारीEknath Shinde-Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणाPriyanka Gandhi : उद्याेगपतींच्या कर्जमाफीवरून प्रियंका गांधींची टीकाPravin Darekar On  Ujjwal Nikam :उज्ज्व निकम यांच्या उमेदवारीचं स्वागतच,प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
Dharmendra : धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,
धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,"सुपरस्टार जोडी"
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
Eknath Shinde : आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था; एकनाथ शिंदेंची जहरी टीका
आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधींवर जहरी टीका
Sunetra Pawar : बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
जळगाव ते मुंबई... मुंबई बॉम्बस्फोट, कोपर्डी, 26/11 दहशतवादी हल्ला; भाजपा उमेदवार उज्जल निकम कोण?
जळगाव ते मुंबई... मुंबई बॉम्बस्फोट, कोपर्डी, 26/11 दहशतवादी हल्ला; भाजपा उमेदवार उज्जल निकम कोण?
Mahayuti Rally in Kolhapur : कोल्हापुरात शाहू महाराजांचा थेट उल्लेख मुख्यमंत्र्यांनी टाळला
कोल्हापुरात शाहू महाराजांचा थेट उल्लेख मुख्यमंत्र्यांनी टाळला
Embed widget