India-China : भारताने चीनचं मार्केट खाल्लं? अमेरिका-ब्रिटनने भारताकडून वस्तू खरेदी करण्यास सुरुवात, चीनला झोंबल्या मिरच्या!
India-China : चीनचा 'या' दोन्ही देशांसोबतचा भौगोलिक-राजकीय तणाव वाढल्याचा फायदा भारतीय उत्पादनांना होत आहे.
India-China : 'आत्मनिर्भर भारत' (Aatmanirbhar Bharat) च्या प्रभावामुळे भारतात (India) इतर देशांतून होणारी आयात तर कमी झाली आहेच, पण निर्यातीच्या बाबतीत भारत आता चीनला (China) अनेक बाजारपेठांमध्ये मागे टाकत आहे. एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की भारताने काही प्रमुख बाजारपेठांमधील इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत चीनचे वर्चस्व कमी करण्यास सुरुवात केली आहे.
भारतात उत्पादनाचा वेग वाढला
इतर देशातील मॅन्यूफॅचरर्स चीन वगळता आशियातील इतर भागांमध्ये पुरवठा साखळ्यांमध्ये (Supply Chain) विविधता आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे भारतात उत्पादनाचा वेग वाढला असून त्याचा फायदा निर्यातीत वाढ होताना दिसत आहे. भारताने इतर देशातील चीनच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीचे प्रमाण कमी केले आहे. त्यात ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. चीनचा या दोन्ही देशांसोबतचा भौगोलिक-राजकीय तणाव वाढल्याचा फायदा भारतीय उत्पादनांना होत आहे.
इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत भारत चीनला मागे टाकणार!
लंडन येथील फॅथम फायनान्शिअल कन्सल्टिंगच्या मते, चीनच्या प्रमाणात भारताची अमेरिकेला इलेक्ट्रॉनिक्स निर्यात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 7.65 टक्क्यांपर्यंत वाढली, तर नोव्हेंबर 2021 मध्ये ती 2.51 टक्के होती. तर ब्रिटनमध्ये ही वाढ 4.79 टक्क्यांवरून 10 टक्के झाली आहे.
उत्पादकांना आकर्षित करण्यात सरकारला यश
इतर देशातील उत्पादकांसाठी भारत हा चीनला पर्याय बनलेला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे भारत सरकारकडून देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या सवलती, ज्यामध्ये कर सवलती, सुलभ भूसंपादन आणि भांडवली आधार यांचा समावेश आहे. यामुळे उत्पादकांना आकर्षित करण्यात सरकारला यश आले आहे, त्यामुळे देशांतर्गत उत्पादन क्षेत्रालाही बूस्टर डोस मिळाला आहे. देशांतर्गत कंपन्यांनीही बाह्य कंपन्यांशी करार करून त्यांचा जागतिक स्तरावर पोहोच मजबूत केला आहे.
मेक इन इंडियाने जादू केली
स्मार्टफोनच्या बाबतीत, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सकडे भारतातील सर्वात मोठा मोबाइल फोन उत्पादन कारखाना आहे. ऍपल आपल्या सर्व आयफोन्सपैकी किमान 7 टक्के भारतातील त्याच्या कॉन्ट्रॅक्ट उत्पादक फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप आणि पेगाट्रॉन कॉर्पद्वारे बनवते. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या 'चायना प्लस वन' धोरणात भारतीय कंपन्या त्यांची भूमिका बजावत आहेत. या अंतर्गत उत्पादक इतर देशांमध्ये बॅक-अप क्षमता विकसित करत आहेत. भारताचा वाढता बाजारहिस्साही 'मेक इन इंडिया' योजना यशस्वी करत आहे, त्यामुळे रोजगार आणि निर्यात वाढत असताना आयातही कमी होत आहे.
हेही वाचा>>>