एक्स्प्लोर

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली तेव्हा काँग्रेसने फणा केला, आपल्या शहिदांवर त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले. मात्र, आज कसाबला फाशी झाली ती उज्ज्वल निकम यांच्यामुळे झाली, असे फडणवीस यांनी म्हटले

मुंबई : भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाजपा महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ मुंबईतील साकीनाका परिसरात सभा घेतली. या सभेतून देशभक्ती आणि दहशतवादावर भाष्य करताना काँग्रेससह (Congress) इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. तसेच, काँग्रेससोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरेही (uddhav Thackeray) गप्प बसले आहेत, तेही काही बोलत नाहीत, असे फडणवीसांनी म्हटले. भाषणाच्या सुरुवातीलाच,  मी मोदीजी आणि नड्डा यांचे आभार मानतो, त्यांनी आतंकवाद्यांशी लढणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली. आठवा तो हल्ला आपल्या मुंबईवरचा, आठवा तो कसाब, जो आपल्या हेमंत करकरे, अशोक कामटे, साळसकर यांना शहीद करून टाकतो,अशी आठवण सांगत फडणवीसांनी उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या उमेदवारीवर भाष्य केलंय 

उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली तेव्हा काँग्रेसने फणा केला, आपल्या शहिदांवर त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले. मात्र, आज कसाबला फाशी झाली ती उज्ज्वल निकम यांच्यामुळे झाली, असे फडणवीस यांनी म्हटले. आधी आपला देश कसा होता, इकडे आतंकवादी यायचे, हल्ले करुन जायचे आणि काँग्रेसचं सरकार फक्त निषेध करायचे. मात्र, मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला. त्यामुळेच, 2019 नंतर आपल्या देशात हल्ला करण्याची हिंमत पाकिस्तानच्या बापाची देखील झाली नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

आपण दहशवाद्यांविरोधात लढा दिला. एक देशाच्या सीमेवर लढणारा आमचा सैनिक होता, दुसरा पोलीस होता, तर आमचा कोर्टात लढणारा एक सैनिक म्हणजे उज्ज्वल निकम होते, असे म्हणत दशवादाच्या मुद्दयावरुन देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. आमचे उद्धव ठाकरेदेखील तोंड बंद करून बसले आहेत. उद्धव ठाकरे काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं. तसेच, उद्धव ठाकरे बोलायला तयार नाही, त्यांना चिंता काही मुठभर मतांची आहे, म्हणून ते तोंड बंद करुन बसले आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंवरही फडणवीसांनी हल्लाबोल केला. 

ही गल्लीची निवडणूक नाही दिल्लीची आहे, आपल्याला देशाचा नेता निवडायचा आहे. देशात आज महाभारतासारखे दोन गट झाले आहेत. कौरवांची संख्या जास्त होती, पांडवांची संख्या कमी होती. आज वेगवेगळ्या पक्षांसोबत आपली युती आहे आणि कौरवांकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधी यांच्याकडे उद्धव ठाकरे आहेत. 

संजय राऊतांवर टीका

सकाळी 9 वाजता उबाठाचा एक भोंगा वाजतो, हा.. पोपटलाल, त्याला कुणीतरी विचारले तुमच्याकडे पंतप्रधान कोण आहे. तेव्हा, तो म्हणाला आमच्याकडे खूप आहेत, 5 वर्षांसाठी 5 पंतप्रधान आहेत. अरे पंतप्रधान निवडायचाय की घंटा संगीत खुर्चीचा खेळ आहे, असे म्हणत फडणवीसांनी संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल केला. तसेच, ज्यांना नेता नाही, निती नाही असे लोक आपल्यासमोर उभे आहेत. पण, आपल्याकडे देशभक्त उज्ज्वल निकम आहेत. 

झोपडीत राहणाऱ्या प्रत्येकाला मोफत घर

मोदींनी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, 50 कोटी लोकांच्या घरी गॅस पोहोचवला. 60 कोटी लोकांच्या घरी नळ दिले, 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले. आमच्या तरुणांना 10 लाखांपर्यंत मुद्रा लोन देण्याचं कामही मोदींनी केले. मोदींनी सागितले तरुणाची गॅरंटी मी घेतो, देशात 10 कोटी महिला लखपती होतील. मोदींनी स्टँड अप योजना आणली, आदिवासी समाजासाठी 24 कोटींची योजना आणली, पारंपारिक व्यवसायिकासाठी 14 कोटींची योजना आणली, काँग्रेस पक्षाने आपल्याला गरिबाच्या नावाने लुबाडले. वेगवेगळी विकास कामे आपण केली, मुंबईच्या झोपडीत राहणाऱ्या प्रत्येकाला पक्क घर मिळेल आणि आम्ही ते मिळवून देऊ, असे आश्वासनही फडणवीसांनी मुंबईच्या सभेतून दिलं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’
डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget