धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
बारामतीत शुक्रवारी युवक आणि युवती गाडीमध्ये गप्पा मारत असताना त्यांना दोन अज्ञात आरोपींनी लुटले या युवकांना लटल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे : बारामती लोकसभा (Baramati) मतदारसंघातील निवडणूक प्रचार आणि मतदानाची सांगता झाल्याने येथील राजकीय वातावरण शांत झालं आहे. मात्र, बारामतीमधील गुंडगिरी व गुन्हेगारीचा विषय ऐरणीवर आल्याचं दिसूनयेत आहे. कारण, युवक-युवतीचे कपडे काढून त्यांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री 7 ते 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याने पोलिसांच्या (Police) कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशष म्हणजे बारामतीमध्ये शिकण्यासाठी आलेले हे विद्यार्थी मित्र फिरायला गेले असता असा प्रकार घडला, युवतीच्या अंगावरील दागिनेही काढून नेल्याने विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे.
बारामतीत शुक्रवारी युवक आणि युवती गाडीमध्ये गप्पा मारत असताना त्यांना दोन अज्ञात आरोपींनी लुटले या युवकांना लटल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी दोघांकडी पैसा व ऐवज लुटल्यानंतर दोघांचे कपडे बळजबरीने काढायला लावले. त्यानंतर, नको त्या अवस्थेत दोघांचे फोटो काढून घेतले आणि हे फोटो व्हायरल काढण्याची धमकी दिली. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवतीच्या अंगावरील 90 हजारांचे दागिने बळजबरीने लंपास केल्याचा देखील गुन्हा अज्ञात दोघांविरोधात दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गोजबावी हद्दीत बारामती विमानतळाजवळ ही घटना घडली. बारामतीत शिकत असलेली तरुणी मित्रासह बारामती विमानतळाच्या परिसरात फिरण्यासाठी गेली असता, गाडीत गप्पा मारत बसलेल्या या दोघांना 30 ते 35 वयोगटातील दोन व्यक्तींनी हटकले. त्यानंतर, तिच्या गळ्यातील सोनसाखळी व कानातील दागिने असा नव्वद हजारांचा ऐवज काढून घेतला. यावेळी, आरोपीने तिच्या मित्राला दगडाने मारहाण करत दोघांनाही गाडीतून बाहेर काढले व एका खड्ड्यात नेऊन अंगावरील कपडे जबरदस्तीने काढायला भाग पाडले. तसेच,नको त्या अवस्थेतील फोटो काढून घेऊन ते व्हायरल करण्याची धमकीही दिली. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात 394 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही अज्ञात आरोपी कोण आहेत, याचा शोध लागला नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
हेही वाचा
Yavatmal Crime News : गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला अटक; पाच जणांसह लाखोंचा मुद्देमाल केला जप्त