(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अनेक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने झेपावण्यास सुरुवात, पृथ्वीला कोणताही धोका नाही; नासाचे स्पष्टीकरण
NASA : या लघुग्रहांमध्ये सर्वात मोठ्या आकार असलेला 2004 UE (1246 फूट) हा लघुग्रह हा देखील नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत पृथ्वीच्या दिशेने येत आहे.
NASA : आजपासून पुढचे काही दिवस मोठ्या आकाराचे अनेक लघुग्रह (Asteroids) पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करुन या दिशेने झेपावणार आहेत अशी माहिती नासाच्या सेंटर फॉर निअर ऑब्जेक्ट स्टडीजच्या (Center for Near-Earth Object Studies) वतीनं देण्यात आली आहे. जवळपास 525 फूट आकार असलेल्या 2021 SM3 हा लघुग्रह सर्वप्रथम पृथ्वीच्या दिशेने येत आहे. तर त्याच प्रकारच्या मोठ्या आकाराचे सात लघुग्रह हे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पृथ्वीच्या दिशेने येणार आहेत. हे सर्व लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने जरी येत असले तरी पृथ्वीवर आदळणार नाहीत. ते पृथ्वीच्या जवळून पास होणार आहेत अशीही माहिती नासाच्या वतीनं देण्यात आली आहे.
या लघुग्रहांमध्ये सर्वात मोठ्या आकार असलेला 2004 UE (1246 फूट) हा लघुग्रह हा देखील नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत पृथ्वीच्या दिशेने येत आहे. 1996 VB3 हा लघुग्रह 20 ऑक्टोबर रोजी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. जरी हे सर्व लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून पास होत असतील तरीही ते टेलिस्कोपच्या मदतीशिवाय दिसणार नाहीत असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
शनिवारी नासाच्या वतीनं लूसी नावाच्या एका स्पेसक्राफ्ट लॉन्च करण्यात आलं आहे. या स्पेसक्राफ्टच्या वतीनं गुरु ग्रहाच्या ट्रोझन या लघुग्रहाचा अभ्यास करणार आहे. या अभ्यासाची कालमर्यादा 12 वर्षे इतकी आहे.
लघुग्रह म्हणजे काय?
लघुग्रह म्हणजे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे सूर्यमालेतील लहान आकाराचे व कमी वस्तुमानाचे ग्रह. मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान रिकाम्या जागेत लघुग्रहांचा पट्टा आहे. ग्रहांच्या निर्मिती काळात ग्रह बनण्यात अपयशी ठरलेले लहान-लहान खडक म्हणजे लघुग्रह होय. सूर्यकुलातील ग्रहांप्रमाणे अनियमित आकाराचे अनेक छोटे ग्रह सूर्याभोवती विशिष्ट कक्षांवरून प्रदक्षिणा करीत आहेत. यांमधील बहुसंख्य लघुग्रह खडकाळ किंवा खनिजसंपन्न असून त्यांच्या कक्षा मंगळ व गुरू या ग्रहांच्या कक्षांच्या दरम्यान आहेत. स्वत:च्या गुरुत्वाकर्षणाखाली गोलाकार होण्यासाठी या वस्तूंचे वस्तुमान पुरेसे नसल्याने, लघुग्रह अनियमित आकाराचे राहिले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- नासाच्या OSIRISREx यानाचं बेन्नू लघुग्रहावरील टच अँड गो मिशन यशस्वी; खड्यांचे नमुनेही मिळवले!
- Mission Artemis NASA : नासाच्या 'मिशन अर्टिमिस'च्या बॅकबोन; सुभाषिनी अय्यर बजावतात महत्वाची जबाबदारी
- Skylab Crash : जमिनी विकल्या, पैसा खर्च केला...जेव्हा अमेरिकन 'स्कायलॅब'मुळे अंताच्या भीतीने भारतीयांची त्रेधातिरपीट उडाली होती