Samosa Ban: 'या' देशात समोसा खाल्यास किंवा बनवल्यास मिळते शिक्षा! जाणून घ्या काय आहे कारण
Samosa Ban: समोसा हा भारतातील (India) अतिशय प्रसिद्ध आणि आवडता स्नॅक्स (Snacks) आहे. समोसा खायला प्रत्येक भारतीयाला आवडतो.
Samosa Ban: समोसा हा भारतातील अतिशय प्रसिद्ध आणि आवडता स्नॅक्स आहे. समोसा खायला प्रत्येक भारतीयाला आवडतो. भारतात अनेक लहान-मोठ्या कार्यक्रमात किंवा घरी पाहुणे आल्यास पाहुणचार करताना पाहुण्यांना चहासोबत समोसा दिला जातो. मात्र जगात असेही काही देश आहेत, जिथे समोसे खाण्यास बंदी आहे. याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते.
या देशात आहे समोस्यावर बंदी
सोमालिया देशात समोसे खाण्यास बंदी आहे. सोमालियामध्ये समोसे बनवणे, विकत घेणे आणि खाणे यासाठी शिक्षेची तरतूद आहे. सोमालियातील एका अतिरेकी गटाचा असा विश्वास आहे की, समोसाचा त्रिकोणी प्रकार ख्रिश्चन समुदायाच्या अगदी जवळ जाणारा आहे.
प्राण्यांचे मांस समोसामध्ये वापरण्यात आले, सोमालियन नागरिकांचा दावा
एका रिपोर्टनुसार, उपासमारीने मरण पावलेल्या प्राण्यांचे मांस समोसामध्ये वापरण्यात आले, असा दावा येथील लोकांनी केला आहे. यामुळेही सोमालियामध्ये समोसे खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच समोशाचा आकार आक्रमकतेचा आकार असल्याचेही येथील लोकांची मान्यता असल्यामचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
16 व्या शतकापासून भारतात आहे समोसा
दरम्यान, समोसे हे प्राण्यांच्या मांसापासून बनवले जात नसून यासाठी बटाटे आणि मैद्याच्या पिठाचा वापर केला जातो. हा एक अतिशय चवदार नाश्ता आहे. जो मैद्यात बटाटे तळून बनवला जातो. भारतात वेगवगेळ्या चटणीसोबतही हा पदार्थ खाला जातो. असे म्हणतात की समोसा हा मूळ भारतीय पदार्थ आहे. त्यानंतर समोसा इतर देशांमध्येही लोकप्रिय झाला. समोस्यांच्या इतिहासाबद्दल सांगायचे तर, 16 व्या शतकातील मुघल काळातही समोशांचा उल्लेख आढळतो.
महत्वाच्या बातम्या :