एक्स्प्लोर
306 मीटर उंचीच्या इमारतीला लटकून मॉडेलचं फोटोशूट
दुबई : हा फोटो पाहिला तर कोणाही सामान्य माणसाच्या हृदयाचे ठोके चुकल्याशिवाय राहणार नाही. रशियाच्या विकी ओडिंटकोवा या सुपरमॉडेलचं फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
विकी ओडिंटकोवा दुबईतील एका गगनचुंबी इमारतीच्या गच्चीवर, कोणत्याही उपकरणाच्या मदतीशिवाय लटकताना दिसत आहे. विशेष म्हणजे फोटोशूटसाठी तिने हा स्टंट केला आहे. आता तिच्या फोटोशूटचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचं वेगळं सांगायला नको.
गगनचुंबी इमारतीला लटकलेल्या विकीच्या एका फोटोलाच आतापर्यंत 99,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. दुबईच्या सायान टॉवरला लटकलेल्या विकीने आधार म्हणून या व्हिडीओचा दिग्दर्शक अलेक्झांडर तिखोमिरोव याचा हात पडकला होता. 70 मजल्यांच्या सायान टॉवरची उंची 1000 फुटांपेक्षा (306 मीटर) जास्त आहे. श्वास थांबायला लावणारा हा फोटो विकी ओडिंटकोवाने 29 डिसेंबर 2016 रोजी इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या 32 लाखांपेक्षा जास्त आहे. एकीकडे या खतरनाक फोटोबाबत विकी ओडिंटकोवाचं कौतुक होत असताना दुसरीकडे स्वत:चा जीव धोक्यात टाकल्याने टीकाही होत आहे. तरीही तिने 3 फेब्रुवारी रोजी या फोटोशूटचा व्हिडीओ पोस्ट केला.
या व्हिडीओला पण आतापर्यंत 51000 पेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर 4.2 लाखांपेक्षा जास्त वेळा व्हिडीओ पाहिला आहे. याशिवाय विकीने एक 'बिहाईंड द सीन्स' व्हिडीओ 30 डिसेंबरला पोस्ट केला होता, जो आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला आहे. त्यानंतर विकी ओडिंटकोवा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.Full video (link in bio)! @a_mavrin #MAVRINmodels #MAVRIN #VikiOdintcova #Dubai A post shared by Viki Odintcova (@viki_odintcova) on
Все трюки выполнены профессионалами, не пытайтесь повторить это самостоятельно. @a_mavrin #VikiOdintcova #MAVRIN #MAVRINmodels #Dubai A post shared by Viki Odintcova (@viki_odintcova) on
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement