Russia Ukraine War : 'पुतिन यांच्या चेहऱ्यावर बुक्की मारण्याची इच्छा', झेलेन्स्की यांचा संताप अनावर
Volodymyr Zelensky : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्यापही सुरुच आहे. व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि व्लादिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे.
Volodymyr Zelensky on Vladimir Putin : रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्ध (War) अद्यापही सुरुच आहे. या दोन्ही देशांमधील संघर्षाला (Russia Ukraine War) दहा महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. मात्र संघर्ष थांबवण्याचं नाव घेत नाही. रशियाच्या हल्ल्यामुळे हजारो नागरिकांसह सैनिकांनाही जीव गमवावा लागला आहे. एकीकडे रशियाकडून युक्रेनवर (Russia Attack on Ukraine) हल्ले सुरु आहेत, तर दोन्ही देशाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. पुतिन यांच्या चेहऱ्यावर ठोसा मारण्याची इच्छा असल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा मोठा हल्ला केला. रशियाने युक्रेनच्या न्यूक्लियर प्लांटवर हल्ला चढवला. रशियाकतडून युक्रेनच्या पायाभूत सुविधांना लक्ष केलं जात आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी ऊर्जा पायाभूत सुविधांवर रशियन हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यावर टीका केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी एलसीआय नावाच्या एका वाहिनीला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, 'त्यांना जेव्हाही संधी मिळेल तेव्हा ते पुतिन यांच्या चेहऱ्यावर ठोसा मारण्यास तयार आहेत.' युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर बहुतेक शहरे आणि प्रदेशांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी नागरिकांना वीजकपातीचा सामना करावा लागत आहे.
In an interview with the LCI channel, #Ukrainian President #Zelenskyy said that he was ready to "punch #Putin in the face" even tomorrow, at the first opportunity. pic.twitter.com/KYI1fszi0z
— NEXTA (@nexta_tv) December 17, 2022
झेलेन्स्की यांचा पुतिन यांच्यावर निशाणा
ला चायना इन्फो (LCI) या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी युद्धाच्या परिस्थिती वर प्रतिक्रिया दिली. पुतीन यांच्याबद्दल वैयक्तिक द्वेष आहे का, असं झेलेन्स्की यांना विचारले असता झेलेन्स्की यांनी उत्तर दिलं. झेलेन्स्की म्हणाले, 'युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून माझे व्यक्तिमत्त्वाची आणि भूमिका याबाबत पुतिन यांच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन नव्हता.'
'मला पुतीन यांच्या तोंडावर ठोसा मारायचा आहे'
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीला जर दुसऱ्या व्यक्तीला मारहाण करायची असेल, तर तो स्वतः करतो. जर मला ही संधी मिळाली तर, मी ते एकट्याने केले असते.' बेलारशियन मीडिया आउटलेट नेक्स्टाने हा व्हिडीओ ट्विट केला होता, ज्यामध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी म्हणाले होते की, ते पुतीन यांच्या तोंडावर ठोसा मारण्यास तयार आहेत. मात्र, शुक्रवारी प्रसारित झालेल्या मुलाखतीमध्ये व्हिडीओमधील हा भाग दाखवण्यात आला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या
IAF Chief On War : रशिया-युक्रेन युद्धामधून भारतानं काय शिकावं? वायुसेना प्रमुख म्हणतात...