Russia Ukraine War : 'रशियाने 70 क्षेपणास्त्र डागली, आम्ही 60 हून अधिक पाडली'; युक्रेनचा दावा
Russia Ukraine Conflict : रशियाचा मोठा क्षेपणास्त्र हल्ला हाणून पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाने 70 क्षेपणास्त्र डागली, त्यातील 60 हून अधिक पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
Ukraine Russia War : रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धाला नऊ महिने उलटून गेले आहेत, मात्र या दोन्ही देशांमधील संघर्ष अद्याप संपलेला नाही. युद्धामुळे युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. असं असलं तरीही युक्रेन रशियाला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. युक्रेन रशिया समोर हार मानायला तयार नाही. रशियाकडून युक्रेनवर वारंवार हल्ले सुरु आहेत. युक्रेन रशियाच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. आता रशियाचा मोठा क्षेपणास्त्र हल्ला हाणून पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाने 70 क्षेपणास्त्र डागली, त्यातील 60 हून अधिक पाडल्याचं युक्रेननं म्हटलं आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रशिया समोर हार मानणार नसल्याची घोषणा याआधीच केली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध अद्याप सुरुच आहे. युक्रेनच्या वायू दलाने सोमवारी सांगितलं की, त्यांनी नुकताच रशियाचा मोठ्या क्षेपणास्त्र हल्ला हाणून पाडला आहे. युक्रेनच्या वायू दलाने दावा करत म्हटलं आहे की, रशियाने सुमारे 70 क्षेपणास्त्र डागली त्यातील 60 हून अधिक क्षेपणास्त्र आम्ही पाडली.
रशियाकडून युक्रेनमधील सोयीसुविधांना हल्ले
रशिया आता युक्रेनमधील सोयीसुविधांना लक्ष्य करत आहे. रशिया न्यूक्लिअर प्लांट आणि पाणीपुरवठा सुविधांवर हल्ला चढवत आहे. रशियाने युक्रेनमधील न्यूक्लिअर प्लांटवर केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील काही भागात वीज संकट निर्माण झालं आहे. युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा खंडित झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रशियन सैन्याने कॅस्पियन समुद्रात जहाजांवरून आणि दक्षिण रशियामधूल 38 क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आहे.
युक्रेन-रशिया युद्धाला नऊ महिने उलटले
24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला चढवत युद्धाला सुरुवात केली. युक्रेनने आतापर्यंत रशियाला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. रशियाकडून हल्ले थांबलेले नाहीत. धोका कायम आहे, पण आम्ही लाढत राहू हार मानणार नाही, असं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक शहर उदध्वस्त झाली आहेत. युक्रेन आणि रशियाचे अनेक सैनिक मारले गेले आहेत. तर युक्रेनमध्ये सहा हजारहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे.
युक्रेनचं आठ लाख कोटी रुपयांचे नुकसान
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे आर्थिक सल्लागार ओलेग उस्टेन्को यांच्या मते, युद्धामुळे युक्रेनचे एक ट्रिलियन डॉलर (सुमारे आठ लाख कोटी रुपये) नुकसान झालं आहे. दुसरीकडे, रशियाने युद्धात आतापर्यंत सुमारे 8,000 अब्ज रुपये खर्च केले आहेत. युक्रेनला मदत करण्यासाठी अमेरिका आणि युरोपने मिळून युद्धात 12,520 अब्ज रुपये खर्च केले आहेत. अन्न आणि इंधनाच्या वाढलेल्या किमती, विस्कळीत झालेली पुरवठा साखळी, महागाई आणि बेरोजगारी यासारख्या घटकांसह, युद्धामुळे जगाला सुमारे 24 लाख कोटी रुपये (3 ट्रिलियन डॉलर) इतकं नुकसान झालं आहे.