IAF Chief On War : रशिया-युक्रेन युद्धामधून भारतानं काय शिकावं? वायुसेना प्रमुख म्हणतात...
Air Chief Marshal VR Chaudhari On War : हवाईदल प्रमुख वी. आर. चौधरी यांनी म्हटलं आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्धासाठी तयार राहणं आवश्यक आहे. तंत्रज्ञानावर अधिक भर देणं आवश्यक आहे.
IAF Chief On War : कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्धासाठी तयार राहणं आवश्यक आहे, असं हवाईदल प्रमुख व्ही.आर. चौधरी (Air Chief Marshal Vivek Ram Chaudhari) यांनी म्हटलं आहे. हवाईदल प्रमुखांनी (Indian Air Force) सांगितलं की, दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धांच्या (War) तयारीवर भर देण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्धासाठी तयार राहायला हवं. रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धामधून आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, असं हवाईदल प्रमुखांनी सांगितलं. गेल्या फेब्रुवारीपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. हे लक्षात घेता लहान आणि जलद ऑपरेशन्सऐवजी दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धांसाठी तयारी करणं आवश्यक आहे. तसेच तंत्रज्ञानावर अधिक भर देण्याची गरज असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.
भारतीय हवाईदल प्रमुख व्ही.आर. चौधरी यांनी शनिवारी 9 डिसेंबर रोजी ‘आजतक अजेंडा’ या कार्यक्रमामध्ये भारतीय हवाई दलाची तयारी आणि आगामी योजनांची माहिती दिली. एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी सांगितले की, 'हवाई दल आम्हाला गरजेच्या वेळी आवश्यक शस्त्रे पुरवण्यात सक्षम आहे.' नौदल प्रमुख अॅडमिरल आर.के. हरी कुमार यांनी सांगितलं की, नौदलही आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत आहे, तसेच त्रि-सेवा रँक सिस्टमच्या (नौदलातील श्रेणी) बदलाबाबत विचार सुरु आहे.
रशिया-युक्रेन युद्धातून काय शिकावं?
नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी सांगितलं की, 'नौदलातील अप्रचलित पद्धतींचा आम्ही अभ्यास करत आहोत. नौदलातील रँक अर्थात श्रेणींमध्ये काही बदल करण्याचा विचार सुरु आहे. युक्रेन-रशिया संघर्षामुळे रणांगणापेक्षापेक्षा हवाई ताकदीचं महत्त्व अधोरेखित झालं आहे.
'प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहायला हवं'
हवाई दल प्रमुख व्ही.आर. चौधरी म्हणाले, 'युद्ध क्षेत्रासोबतच हवाई क्षेत्रही खूप महत्वाची आहे.युद्ध कधी संपेल हे आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे युद्धाचा वेळा त्याचा लष्करावर होणारा परिणाम याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. याआधी आम्ही छोट्या युद्धाची तयारी करायचो. पण आता आपल्याला दीर्घकाळ युद्ध लढण्यासाठीही तयार राहावे लागेल. त्यासाठीचा दारू, गोळा, तंत्रज्ञान, रसद आणि रणनीती वाढवायची गरज आहे
नऊ महिन्यांहून अधिक काळ लष्करी आक्रमणानंतरही रशियाला युक्रेनवर विजय मिळवता आलेला नाही. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यातून भारत काय धडा शिकू शकतो, असे विचारले असता चौधरी म्हणाले की, या युद्धातून भारताने धडा घेतला पाहिजे.