Russia Ukraine War : McDonalds रशियातील 850 रेस्टॉरंट बंद करणार, जाणून घ्या काय असेल कर्मचाऱ्यांचं भविष्य?
Russia Ukraine War : युक्रेनच्या समर्थनार्थ पावले उचलत, मॅकडोनाल्ड्सने रशियामधील सर्व 850 रेस्टॉरंट्स तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 14 वा दिवस आहे. रशिया युक्रेनवर हल्ला तीव्र करत आहे, यामुळे ज्याबद्दल जगभरातील देश नाराज आहेत. आतापर्यंत अनेक देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत, तर मोठ्या कंपन्याही रशियाच्या विरोधात आणि युक्रेनच्या समर्थनार्थ पावले उचलताना दिसत आहेत. यामध्ये, आता मॅकडोनाल्ड्सने (McDonalds) रशियामधील सर्व 850 रेस्टॉरंट तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी दोन्ही देशांमध्ये चर्चेची तिसरी फेरी झाली, मात्र ही चर्चेची फेरीही निष्फळ ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, मॅकडोनाल्ड्सने रशियातील सर्व 850 रेस्टॉरंट कर्मचार्यांना एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ क्रिस केम्पझिंस्की यांनी सांगितले की, सध्या रेस्टॉरंट बंद करण्याचे ठरवले आहे कारण, मॅकडोनाल्ड्स युक्रेनवर अशा हल्ल्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. दरम्यान, मॅकडोनाल्डने आपल्या कर्मचार्यांचा विचार लक्षात घेऊन रेस्टॉरंट बंद असतानाही रशियामधील सर्व 62 हजार कर्मचार्यांना पगार देत राहणार असल्याचं सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियातील 84 टक्के रेस्टॉरंट मॅकडोनाल्डकडे आहेत. गेल्या वर्षी कंपनीच्या महसुलात रशिया आणि युक्रेनचा वाटा 9 टक्के असल्याचे कंपनीने म्हटले. यापूर्वी केएफसी (KFC) आणि पिझ्झा हट (Pizza Hut) यांनीही त्यांची गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेत युक्रेनला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : युक्रेन-रशिया युद्धाचा भारतीयांना फटका; 'या' गोष्टी महागण्याची शक्यता, खाद्यतेलाचा साठा करण्यात गुंतले लोक
- Russia Ukraine War : देश सोडून चाललेल्या गर्लफ्रेंडला युक्रेनच्या सैनिकाचं प्रपोज, चेकपॉईंटवरच घडला प्रकार, व्हिडिओ व्हायरल
- Russia Ukraine Conflict : पोलंडमधील 'ऑपरेशन गंगा' मोहीम फत्ते, जखमी हरजोतला घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी परतले
- Ukraine Russia War : 'मी कोणालाही घाबरत नाही', देश सोडण्याच्या बातम्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा व्हिडिओ, केला 'हा' दावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha