Raaz Actress Malini Sharma Vanished From Film Industry: 'राझ' सिनेमातील भूत, 23 वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमधून गायब; गेली कुठे? 'ती' सध्या काय करते?
Raaz Actress Malini Sharma Vanished From Film Industry: मालिनी शर्मानं या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि 'राझ'च्या यशानं तिला एका रात्रीत स्टार बनवलं. बिपाशा बासू या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकली असली, तरीसुद्धा सिनेमाचा खरा चेहरा मालिनीच होती.

Raaz Actress Malini Sharma Vanished From Film Industry: बॉलिवूडचा (Bollywood News) असा एक सिनेमा जो आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. 2002 मध्ये प्रदर्शित झालेला महेश भट्ट (Mahesh Bhatt) दिग्दर्शित बिपाशा बासू आणि दिनो मोरिया यांचा 'राझ'(Raaz Movie) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) प्रचंड धुमाकूळ घालतोय. हा सिनेमा त्या वर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनला आणि बॉलिवूडमधील सर्वात भयानक चित्रपटांपैकी एक मानला जातो. या हॉरर सिनेमाचं (Horror Movie) वैशिष्ट्य म्हणजे, त्यातील मुख्य अभिनेत्री मालिनी शर्मा (Malini Sharma), जिनं एका आत्म्याची भूमिका साकारली होती.
मालिनीनं या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि 'राझ'च्या यशानं तिला एका रात्रीत स्टार बनवलं. बिपाशा बासू या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकली असली, तरीसुद्धा सिनेमाचा खरा चेहरा मालिनीच होती. त्यावेळी मालिनीसोबत शूट करण्यात आलेला प्रत्येक सीन आणि गाणं व्हायरल झालं. तिच्या इंटिमेट सीन्सची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. ती इंडस्ट्रीची नवी सेन्सेशन बनली. 'राझ'च्या यशानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या, पण नंतर मात्र ती गायब झाली. 'राझ'च्या यशानंतर रातोंरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सिनेमा रिलीज झाल्यानंतर मात्र अचानक गायब झाली. आज सिनेमाला 23 वर्ष उलटली, ही अभिनेत्री कुठे आहे? तिचा ठावठिकाणा कुणालाच ठाऊक नाही.
'राझ' सिनेमामध्ये भूत म्हणून चर्चेचा विषय ठरलेली अभिनेत्री मालिनी शर्मा एक मॉडेल होती. या सिनेमामुळे ती भलतीच चर्चेत आलेली. पण, ज्या सिनेमामुळे प्रसिद्धी मिळाली, नाव मिळालं तोच तिचा पहिला आणि शेवटचा सिनेमा ठरला. जरी त्यानंतर तिला अनेक ऑफर आल्या तरीही, तिनं कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही. आज ती एका यशस्वी मॉडेल आणि म्युझिक व्हिडीओ स्टार म्हणून ओळखली जाते. मालिनीचं सिनेमांमधलं करिअर तसं दीर्घकाळ टिकलं नाही, पण तिच्या गायब होण्यामागील कारणं मात्र अनेक प्रकारे चर्चा करण्यासारखी आहेत.
'राझ' सिनेमानंतर 'ती' अभिनेत्री झाली गायब
'राझ' हा मालिनी शर्माचा शेवटचा सिनेमा ठरला. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार मालिनी शर्मा महेश भट्ट यांच्यासोबत आणखी एका चित्रपटात काम करणार होती, पण शुटिंग सुरू होण्याच्या एक दिवस आधी तिनं तिचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं. असं म्हटलं जातं की, तिनं घेतलेल्या या निर्णयामुळे भट्ट कॅम्पनं तिच्यावर कायमचा बहिष्कार घातला.
प्रसिद्ध अभिनेत्याशी बांधलेली लग्नगाठ
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी, मालिनी शर्मानं मॉडेलिंग जगात बरीच प्रसिद्धी मिळवली होती आणि 'सावन में लग गई आग', 'क्या सूरत है', 'रानझर' आणि 'कितनी अकेली' यांसारख्या अनेक सुपरहिट म्युझिक व्हिडीओंचा भाग होती. तिची प्रसिद्धी आणि यश असूनही, तिची प्रेमकहाणी हादरवणारी होती. तिने 1997 मध्ये मॉडेल आणि अभिनेता प्रियांशु चॅटर्जीशी लग्न केलं, पण 2001 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. हे लग्न तिच्यासाठी एक मोठा धक्का होता. ब्रेकअपनंतर, मालिनीनं स्वतःला इंडस्ट्रीपासून दूर केलं.
स्वतःला इंडस्ट्रीपासून दूर केलं
मालिनी शर्मानं मनोरंजन जगतापासून स्वतःला पूर्णपणे दूर केलं. 'राझ' सिनेमातून प्रसिद्धी मिळाल्यानंतर ती गायब झाली. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या मालिनी शर्मा प्रसिद्धीपासून दूर खाजगी जीवन जगतेय आणि तिचा सध्याचा ठावठिकाणा कुणालाच ठाऊक नाही. दरम्यान, काही पत्रकार असंही म्हणतात की, अभिनय सोडल्यानंतर तिनं 'थोडा प्यार थोडा मॅजिक' आणि 'जस्ट मॅरीड' सारख्या चित्रपटांसाठी आर्ट डायरेक्टर म्हणून काम केलेलं.
दरम्यान,मालिनी शर्माच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केलेली. तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे ती लवकरच लोकप्रिय झाली आणि ती विविध म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली. 'सावन में लग गई आग', 'क्या सूरत है', 'रानझर' आणि 'कितनी अकेली' यासारख्या लोकप्रिय गाण्यांमध्ये मालिनी दिसली. यामुळे तिच्या लोकप्रियतेला आणखी वाव मिळाला, पण त्यानंतरही तिनं सिनेक्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आज ती कुठेय? काय करतेय? कुणालाच ठाऊक नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























