Russia Ukraine War : युक्रेन-रशिया युद्धाचा भारतीयांना फटका; 'या' गोष्टी महागण्याची शक्यता, खाद्यतेलाचा साठा करण्यात गुंतले लोक
Russia Ukraine War : भारत खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात करतो. भारत 90 टक्के सूर्यफूल तेल रशिया आणि युक्रेनमधून आयात करतो.
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरूच आहे. दरम्यान, महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या काळात खाद्यतेल आणि इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची भीतीही लोकांमध्ये कायम आहे. अशा परिस्थितीत अनेक भारतीय खाद्यतेल आणि इंधनाचा साठा करण्यात व्यस्त आहेत. रशियाच्या युक्रेनवर आक्रमणामुळे खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी भीती लोकांमध्ये आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. अशा परिस्थितीत जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम देशात गंभीरपणे होऊ शकतो. युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी होई शकतात, असेही सोशल मीडियावर पसरवले जात आहेत. अनेक लोक खाद्यतेलाचा वापर कमी करत आहेत.
खाद्यतेलाचा साठा करण्यात गुंतलेले लोक
एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत खाद्यतेलाच्या किमतीत 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यासोबतच सोशल मीडियावर तेलाच्या तुटवड्याबाबतच्या फेक व्हायरल मेसेजमुळे देशातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात करतो. भारत 90 टक्क्यांहून अधिक सूर्यफूलाच्या बियांचे तेल रशिया आणि युक्रेनमधून आयात करतो. एकूण खाद्यतेलाच्या आयातीमध्ये सूर्यफूलाच्या तेलाचा वाटा सुमारे 14 टक्के आहे. मुंबईस्थित सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बीव्ही मेहता यांनी सांगितले की, पाम तेल, सोयाबिन तेल, रेपसीड तेल आणि शेंगदाण्याचे तेल या इतर खाद्यतेलांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
निवडणुका संपल्यानंतर महागाई वाढण्याची शक्यता
देशांतर्गत बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सरकारी तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशसह अनेक प्रमुख राज्यांतील निवडणुकांमुळे किमती वाढवल्या नाहीत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा संपल्यानंतर आता सरकार किमती वाढवण्याचे पाऊल उचलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही लोक किमती वाढण्याची भीतीने पेट्रोल, डिझेलचा साठा करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : देश सोडून चाललेल्या गर्लफ्रेंडला युक्रेनच्या सैनिकाचं प्रपोज, चेकपॉईंटवरच घडला प्रकार, व्हिडिओ व्हायरल
- Russia Ukraine Conflict : पोलंडमधील 'ऑपरेशन गंगा' मोहीम फत्ते, जखमी हरजोतला घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी परतले
- Ukraine Russia War : 'मी कोणालाही घाबरत नाही', देश सोडण्याच्या बातम्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा व्हिडिओ, केला 'हा' दावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha