Russia Ukraine War : रशियन हल्ल्याविरोधात फेसबुकने आपलाच नियम केला शिथील, रशियाविरोधात हिंसक भाषेला परवानगी
Russia Ukraine War : युक्रेन युद्धानंतर फेसबुकने रशियावर काही निर्बंध लादले होते. आता फेसबुकने 'रशियन आक्रमणकर्त्यां'विरोधात हिंसक भाषणाला परवानगी दिली आहे.
Russia Ukraine War : युक्रेनवरील हल्ल्यामुळे जगातील सर्व देश आणि कंपन्यांकडून रशियावर दबाव आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. दरम्यान, अनेक मोठ्या कंपन्यांनी रशियाबरोबरचा व्यवसाय बंद केला आहे, तर अनेक कंपन्या युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. यामध्ये फेसबुक (Facebook) पुन्हा एकदा पुढे आले आहे. एका अहवालानुसार, फेसबुकने रशियन हल्ल्याविरोधात हिंसक भाषेला परवानगी देणारे नियम शिथिल केले आहेत.
फेसबुकवर हिंसक भाषेला परवानगी नाही
फेसबुकच्या धोरणानुसार, या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारचे द्वेषपूर्ण भाषण, हिंसक किंवा आक्षेपार्ह भाषेला परवानगी नाही. फेसबुकवर अशा गोष्टींवर बंदी आहे, पण युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी फेसबुकने आता यासंबंधिचे नियम शिथिल केले आहेत. यामुळे लोक उघडपणे रशियाविरुद्ध बोलू शकतील आणि विरोध करू शकतील.
रशियाने काही दिवसांपूर्वी फेसबुकवर घातली होती बंदी
याआधी फेसबुकने रशियामध्ये अनेक कडक निर्बंध लादले होते. यानंतर रशियाने फेसबुकवर कडक कारवाई करत फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली. रशियाची सेन्सॉरशिप एजन्सी Roskomnadzor ने फेसबुकवर रशियन मीडियाशी भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.
'या' कारवाईवर फेसबुकने घेतला होता आक्षेप
फेसबुकने रशियाच्या कारवाईवर म्हटले आहे की, रशिया आपल्या लाखो लोकांना विश्वसनीय माहितीपासून वंचित ठेवत आहे. फेसबुकवर बंदी घातल्यानंतर रशियाने ट्विटरवरही कारवाई केली. फेसबुकशिवाय रशियन सरकारने ट्विटरवर काही दिवसांपूर्वी बंदी घातली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine Conflict : अॅल्युमिनिअम महागले! रशिया-युक्रेन युद्धाव्यतिरिक्त 'या' गोष्टींचा परिणाम
- Russia Ukraine War : 'रशियाशी लढण्यासाठी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याचा कोणताही हेतू नाही', व्हाईट हाऊसचं वक्तव्य
- अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये मारला गेला अबू इब्राहिम अल-हाशिमी, ISISकडून वृत्ताला दुजोरा, नव्या नेत्याची घोषणा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha