Russia-Ukraine Crisis : पंतप्रधान मोदी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी 'आशेचा पूल', पियुष गोयल यांच्याकडून OperationGanga चे कौतुक
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) चे कौतुक करणारा एक फोटो केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शेअर केला आहे.
![Russia-Ukraine Crisis : पंतप्रधान मोदी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी 'आशेचा पूल', पियुष गोयल यांच्याकडून OperationGanga चे कौतुक Russia-Ukraine Crisis: Piyush Goyal Tweet on Pm Narendra Modi Twitter, know in details Russia-Ukraine Crisis : पंतप्रधान मोदी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी 'आशेचा पूल', पियुष गोयल यांच्याकडून OperationGanga चे कौतुक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/03/47498e53686c522e2bdbab91108678b3_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Russia-Ukraine Crisis: युक्रेन (Ukraine) हे युद्धभूमी बनले आहे, यामुळे लोकांच्या जीवाचा धोका आहे. सगळीकडे विध्वंसांचे दृश्य दिसतंय, यामुळेच स्वत:ला वाचवण्यासाठी युक्रेन सोडणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकले आहे. या अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्राकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी फोटो शेअर करत ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) चे कौतुक केले आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'आशेचा पूल' आहे, या आशयाचा फोटो शेअर केला आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) राबविण्यात येत आहे. Operation Ganga अंतर्गत आतापर्यंत शेकडो भारतीयांना मायदेशात आणले आहे. Operation Ganga चे कौतुक करणारा फोटो पियुष गोयल यांनी शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक नदी दाखवली आहे. एका बाजूला युक्रेनमध्ये अडकलेले नागरिक आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळे देश आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान, चायना, अमेरिकेच्या नागरिकांना अद्याप मदत मिळाली नाही.
PM @NarendraModi ji, India's 'Bridge of Hope'
— Piyush Goyal (@PiyushGoyal) March 3, 2022
#OperationGanga pic.twitter.com/O3hZVPyGGS
युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये मागील आठ दिवसांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने Operation Ganga सुरु केले आहे. त्याअंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणले जात आहे. त्याशिवाय युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांसाटी OpGanga helpline नावाचे ट्विटर अकाऊंट उघडण्यात आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसंबंधित सर्व प्रश्न या ट्विटर अकाऊंटवर टाकल्यास उत्तर देण्यात येतात. यासाठी भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने वेगाने प्रयत्न करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)