(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistan : पाकिस्तानच्या मदरशांमध्ये तयार होताएत दहशतवादी, रिपोर्टमध्ये दहशतवाद संबंधित अनेक खुलासे
Pakistan : पाकिस्तान नेहमीच याला नकार देत असला, तरी पाकिस्तानच दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे पुरावे वेळोवेळी समोर आले आहेत.
Pakistan : भारतात विशेषत: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद हा शेजारील देश पाकिस्तानमधून येतो, ही गोष्ट काही नवीन नाही आणि लपलेलीही नाही. पाकिस्तान नेहमीच याला नकार देत असला, तरी पाकिस्तानच दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे पुरावे वेळोवेळी समोर आले आहेत. अलीकडेच अमेरिकन थिंक टँक बाल्टिमोर पोस्ट एक्झामिनरच्या रिपोर्टमध्ये पाकिस्तानी दहशतवादाशी संबंधित अनेक खुलासे करण्यात आले आहेत. जाणून घेऊया काय आहेत हे खुलासे
मदरशांमधून दहशतवादी तयार होतात
पाकिस्तान मदरशांच्या माध्यमातून भारत आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दरवर्षी सुमारे 40 हजार मदरसे मोठ्या प्रमाणात दहशतवादी तयार करत असतात. काश्मीरवर आधारित प्रत्येक प्रकारचे धोरण अजूनही तेथील लष्कराकडूनच बनवले जाते, असे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या सर्व कारणांमुळे पाकिस्तानमधून दहशतवाद संपत नाही. लष्कराच्या दबावामुळेच नवे पंतप्रधान शाहबाज शरीफही वारंवार काश्मीरचे गोडवे गात आहेत.
...त्यामुळे काश्मीरवर नेहमीच डोळा राहिला आहे
रिपोर्टनुसार, पाकिस्तानही कृषीप्रधान देश आहे. त्याच्या पश्चिमेकडे नजर टाकली, तर इथे लागणारे दोन तृतीयांश पाणी काश्मीरमधील नद्यांमधून येते. अशा परिस्थितीत या भागात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी काश्मीरचा ताबा घेतला. त्यानंतर नेहरूंनी हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलून धरला तेव्हा सुरक्षा परिषदेने पाकिस्तानला माघार घेण्याचे आदेश दिले, पण त्यानंतरही पाकिस्तान तिथून हटला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Elon Musk Buy Twitter : एलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक, 44 अब्ज डॉलरचा करार
- Rajasthan Temple Demolition : राजस्थानमधील पुरातन मंदिर पाडण्यावर सरकारची मोठी कारवाई, मुख्यमंत्री गेहलोत यांनी दिले 'हे' आदेश
- Trending News : आनंद महिंद्रांनी एलॉन मस्कना दाखवली 'भारतीय देशी टेस्ला', सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
- Russia Ukraine War : मारियुपोलमध्ये बुचापेक्षा मोठ्या नरसंहार, सॅटेलाईफ फोटमध्ये आढळल्या 200 पेक्षा जास्त कबरी