Russia Ukraine War : मारियुपोलमध्ये बुचापेक्षा मोठा नरसंहार, सॅटेलाईट फोटोमध्ये आढळल्या 200 पेक्षा जास्त कबरी
Russia Ukraine Crisis : मारियुपोलमधील धक्कादायक फोटो समोर आले आहेत. हे फोटो सॅटेलाइटच्या साहाय्याने घेण्यात आले आहेत. यामध्ये रांगेत 200 हून अधिक कबरी आढळल्या आहेत.
Russia Ukraine Conflict : युक्रेनमधील मारियुपोल शहरामध्ये अडकलेल्या लाखो नागरिकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे आवाहन सातत्यानं केलं जात आहे. दरम्यान, युद्धामधील काही धक्कादायक वास्तव दाखवणारे आणि हदय पिळवटून टाकणारे फोटो पुन्हा एकदा समोर आले आहेत. हे फोटो सॅटेलाइटवरून घेण्यात आली असून ते केवळ मारियुपोल शहराचे आहेत. या फोटोंमध्ये रांगेत कबरी खोदण्यात आल्या आहेत. त्यामध्ये काही मृतदेह दफन करण्यात आले असून काही मृतदेह दफन करण्याची तयारी सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारियुपोल शहरामध्ये 200 हून अधिक कबरी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
युक्रेनियन मीडियाने जारी केला फोटो
युक्रेनियन मीडिया हाऊस 'नेक्स्टा'ने हे फोटो शेअर करताना सांगितलं आहे की, मारियुपोलपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या स्टारी क्रिम गावात ही सामूहिक कबर आढळली आहे. रशियन सैनिक या कबरींमध्ये युक्रेनियन नागरिकांना दफन करत आहेत.
The occupiers razed the land, and then captured the village of Novotoshkivske, Luhansk region.
— ☆ℤ𝕖𝕣𝕆𝕟𝕖☆ (@TreLarat) April 25, 2022
1/2 pic.twitter.com/ykzhfn1Y76
महापौरांनी यापूर्वीच केला होता दावा
मारियुपोलचे महापौर वदिम बोइचेन्को यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांना मारियुपोल शहर पूर्णपणे रिकामं करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी सांगितलं की, 'सुमारे एक लाख युक्रेनियन लोक मारियुपोल शहरामध्ये अडकले आहेत. आम्ही नागरिकांच्या स्थलांतराची वाट पाहत आहोत. रशियन सैन्याकडून युक्रेनियन नागरिकांवरील हल्ले सुरुच आहेत.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Elon Musk Buy Twitter : एलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक, 44 अब्ज डॉलरचा करार
- Rajasthan Temple Demolition : राजस्थानमधील पुरातन मंदिर पाडण्यावर सरकारची मोठी कारवाई, मुख्यमंत्री गेहलोत यांनी दिले 'हे' आदेश
- Trending News : आनंद महिंद्रांनी एलॉन मस्कना दाखवली 'भारतीय देशी टेस्ला', सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल