(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajasthan Temple Demolition : राजस्थानमधील पुरातन मंदिर पाडण्यावर सरकारची मोठी कारवाई, मुख्यमंत्री गेहलोत यांनी दिले 'हे' आदेश
Rajasthan Temple Demolition : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील राजगडमधील तीन मंदिरे आणि 100 दुकानांसह काही घरांवर अधिकाऱ्यांनी बुलडोझर फिरवला. यामध्ये 300 वर्षाचे पुरतान शिव मंदिर देखील पाडण्यात आलं.
Rajasthan Temple Demolition : राजस्थानमधील अलवरमध्ये अतिक्रमण हटवताना 300 वर्ष जुन्या शिव मंदिरावर बुलडोझर चालवल्याप्रकरणी आता सरकारने मोठी कारवाई केली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजगडच्या नगरपालिकेच्या अध्यक्षांसह तीन जणांना निलंबित केलं आहे. अलवरच्या राजगडमध्ये तीन जणांवर मंदिर पाडल्याचा आरोप आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठी कारवाई करत राजगड नगरपालिकेचे अध्यक्ष सतीश दुहरिया यांना निलंबित केलं आहे. तसेच राजगड नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी बनवारीलाल मीना यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. यासह एसडीएम केशव कुमार मीना यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाच्या वकिलाने दाखल केली तक्रार
राजगडमधील प्राचीन शिवमंदिरावर बुल्डोझर चालवल्याप्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका वकिलाने एफआयआर दाखल केली होती. दरम्यान, राजगड येथील नगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत केवळ एक नाही तर तीन मंदिरे आणि 140 हून अधिक दुकानं आणि घरेही पाडण्यात आली.
Rajasthan government has suspended Rajgarh Sub-Divisional Magistrate (SDM) Keshav Kumar Meena, Rajgarh Municipality Board's chairman Satish Duharia and Executive Officer (EO) of the nagar panchayat, Banwari Lal Meena with immediate effect over temple demolition in Alwar
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) April 25, 2022
जिल्हा प्रशासन कार्यालयासमोर आंदोलन
या कारवाईमुळे बाधित झालेल्या नागरिकांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली. आंदोलन चिघळताना पाहून पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. यानंतर आंदोलक आणखी संतप्त झाले. त्यामुळे काही वेळाने त्यांना सोडण्यात आलं. त्यानंतर हे प्रकरण मिटलं. या कारवाईतील बाधितांच्या पुनर्वसनाच्या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी सरकारने आयुक्तांवर सोपवली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Alwar Demolition: शिव मंदिर पाडल्याच्या मुद्यावरुन ओवेसी आक्रमक, म्हणाले भाजप RSS ने माफी मागावी
Sammruddhi Mahamarg : उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गाची कमान कोसळून मोठी दुर्घटना, 1 ठार तर 2 जखमी
Elon Musk Buy Twitter : एलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक, 44 अब्ज डॉलरचा करार