पाकिस्तानात कराची विमानतळाजवळ प्रवासी विमान कोसळून अपघात!
कराची विमानतळाजवळील निवासी भागात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) विमान कोसळले.
नवी दिल्ली : कराची विमानतळाजवळ उतरण्यापूर्वी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) विमान कोसळून मोठा अपघात झाला. पीआयएचे प्रवक्ते अब्दुल सत्तार यांनी विमान कोसळल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. या ए-320 विमानात एकूण 107 लोक होते. पैकी 99 प्रवासी आणि क्रूचे आठ सदस्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 15 ते 20 लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. हे विमान सुमारे दहा वर्ष जुने आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विमान अपघाताच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की पीआयएच्या दुर्घटनेची घटना धक्कादायक आणि खेदजनक आहे. मी पीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरशद मलिक यांच्या संपर्कात आहे. अर्शद मलिक कराचीला रवाना झाले आहेत.
दुपारी अडीचच्या सुमारास हे विमान लाहोरहून कराचीला निघाले होते. कराची विमानतळाजवळील निवासी भागात ते क्रॅश झाले. रहिवासी क्षेत्र असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 52 लाखांच्या जवळ, 20.78 लाखांहून अधिक बरे झाले
अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराचा लोट दिसून येत आहे. बचाव अधिकारी जखमींना जवळच्याच रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. विमान अपघातामुळे कराचीतील सर्व मोठ्या रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
पाकिस्तान लष्कराच्या मीडिया विंग इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनने (आयएसपीआर) ट्विट केले आहे की, पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर मदतीसाठी पोहचले आहेत. सैन्यदलाची क्विक अॅक्शन टीम आणि पाकिस्तानी सैनिक नागरिकांच्या मदत व बचावासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे विमान जीना गार्डनजवळ कोसळले. या स्फोटाचा आवाज दूरवरून ऐकू आला.
China Defence | कोरोनाच्या संकटातही चीनची संरक्षण क्षेत्रासाठी 179 बिलियन डॉलर्सची तरतूद