एक्स्प्लोर

Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 52 लाखांच्या जवळ, 20.78 लाखांहून अधिक बरे झाले

कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 52 लाखांच्या जवळ गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 20.78 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. कुठल्या देशात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...

मुंबई : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे जवळपास  52 लाख रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये 105,766  नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर कोरोनामुळं 4,833 बळी गेले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 5,194,099 लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 34 हजार 072  वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 20 लाख 78 हजार 536 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 39 लाखांच्या घरात आहे. वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 118,226 रुग्ण आहेत. तर 3,584 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 66,089 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 48,553 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,620,457 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 96,295 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 36,042 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 250,908 इतकी आहे.  स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,940 लोकांचा मृत्यू झालाय. 280,117 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 32,486 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 228,006 इतका आहे.

कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
  • अमेरिका: कोरोनाबाधित- 1,620,457, मृत्यू- 96,295
  • रशिया: कोरोनाबाधित- 317,554, मृत्यू- 3,099
  • ब्राझील: कोरोनाबाधित- 310,087, मृत्यू- 20,047
  • स्पेन: कोरोनाबाधित- 280,117, मृत्यू- 27,940
  • यूके: कोरोनाबाधित- 250,908, मृत्यू- 36,042
  • इटली: कोरोनाबाधित- 228,006, मृत्यू- 32,486
  • फ्रांस: कोरोनाबाधित- 181,826, मृत्यू- 28,215
  • जर्मनी: कोरोनाबाधित- 179,021, मृत्यू- 8,309
  • टर्की: कोरोनाबाधित- 153,548, मृत्यू- 4,249
  • इरान: कोरोनाबाधित- 129,341, मृत्यू- 7,249
12 देशांमध्ये प्रत्येकी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित

अमेरिका, जर्मनी,स्पेन, फ्रांस, टर्की, इराण, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत आणि पेरु हे बारा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 96 हजारांवर गेला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सUday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रियाDevendra Fadnavis  : आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
Embed widget