एक्स्प्लोर

कोरोनापाठोपाठ इंग्लंडमध्ये Norovirusचा प्रादुर्भाव, जाणून घ्या नेमका कसा आहे 'हा' व्हायरस

Norovirus outbreak in UK : कोरोनापाठोपाठ इंग्लंडमध्ये नोरोव्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच नोरोव्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये अलर्टही जारी करण्यात आला आहे.

Norovirus outbreak in UK : जगभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. अशातच इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसच्या निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. पण, आता नोरोव्हायरसच्या प्रादुर्भावाचा इशारा देण्यात आला आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई)ने देशात अलर्ट जारी केला आहे. नोरोव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

पीएचईनं दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या शेवटापासून पुढच्या पाच आठवड्यांमध्ये इंग्लंडमध्ये नोरोव्हायरसची लागण झालेल्या 154 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 5 वर्षांमध्ये समान काळात नोरोव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये तीन पटींनी वाढ झाली आहे. 

नोरोव्हायरस काय आहे? 

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) नुसार, नोरोव्हायरस एक संसर्गजन्य व्हायरस आहे. ज्यामुळे उलट्या आणि मळमळ यांसारखी लक्षणं दिसून येतात. पीएचई याला 'Winter Vometing Bug' असं म्हटलं आहे. 

अत्यंत चिंताजनक गोष्ट म्हणजे, पीएचईनं शैक्षणिक सेटिंग्समध्ये नोरोव्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची सूचना विशेषतः नर्सरी आणि चाइल्ड केअर सुविधांमध्ये दिली आहे. 

नोरोव्हायरसची लक्षणं : 

नोरोव्हायरसनं इंग्लंडसोबतच जगभरातील इतर देशांची चिंताही वाढवली आहे. सीडीसीनं नोरोव्हायरसची काही मुख्य लक्षण जारी करण्यात आली आहेत. जुलाब, उलट्या, मळमळ होणं आणि पोटाच्या समस्या उद्भवतात. यामुळे पोटाला किंवा आतड्यांना सूजही येते. इतर लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी आणि शरीरामध्ये वेदना होणं यांसारख्या समस्याही उद्भवतात. रुग्णांमध्ये नोरोव्हायरसची लक्षणं दिसण्यास 12 ते 48 तासांचा अवधी लागतो. 

नोरोव्हायरसवर उपचार : 

या व्हायरसवर सध्या कोणतंही प्रभावी औषध उपलब्ध नाही. विशेषतः या आजारामध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांसाठी वापरली जाणारी औषधं पिण्याचा सल्ला दिला जातो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Embed widget