(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Monkey B Virus : चीनमध्ये 'मंकी-बी' व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू; जाणून घ्या लक्षणं
मंकी व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाचा चीनमध्ये मृत्यू झाला आहे. ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, मंकी बी व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत.
Monkey B Virus : कोरोना व्हायरसपाठोपाठ आता आणखी एका व्हायरसचं संकट घोंघावत आहे. सध्या मंकी बी व्हायरसचा (Monkey B Virus -BV) प्रादुर्भाव वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये या व्हायरसच्या संसर्गामुळे एका व्यक्तीचा बीजिंगमध्ये मृत्यू झाला आहे. चीन सीडीसी विकलीनं (China CDC Weekly) दिलेल्या वृत्तानुसार, मार्च महिन्याच्या सुरुवातीला 2 माकडांवर ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्यानंतर या माकडांवर ऑपरेशन ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं होतं, त्यांना या व्हायरसची लागण झाली होती.
मार्चमध्ये माकडांचं ऑपरेशन केलेल्या 53 वर्षीय डॉक्टरांना मळमळ आणि उलट्यांचा (nausea and vomiting) त्रास होऊ लागला. त्यानंतर एका महिन्यानं उलटी, ताप आणि न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवल्या होत्या, या डॉक्टरांनी अनेक रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. पण 27 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. या गोष्टीचा खुलासा चीन सीडीसी विकलीने शनिवारी प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये केला आहे.
एप्रिलमध्ये रिसर्चर्सने या रुग्णाच्या अनेक चाचण्या केल्या होत्या. त्यानंतर चाचण्यांच्या अहवालामध्ये अल्फाहेपेस्वायरस इन्फेक्शन (alphaherpesvirus infection) असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर आणखी काही चाचण्या करण्यात आल्या. IVDC ने सॅम्पल्सच्या चार टेस्ट केल्या होत्या. ही टेस्ट मंकी बी, वॅरिसेला जोस्टर व्हायरस (varicella-zoster virus -VZV), मंकीप्रॉक्स व्हायरस (monkeypox virus आणि ऑर्थोपोक्सव्हायरस (orthopoxvirus) यासाठी केली जाते. दरम्यान, या चाचणीमध्ये मंकी बी व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.
ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, मंकी बी व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या. पण त्या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली.
Monkey B Virus ची लक्षणं :
मंकी बी व्हायरसची लक्षणांमध्ये स्मॉलपॉक्स आणि मंकीपॉक्स दोन्ही प्रकरणांमध्ये शरीरावर दाग आणि चकते येतात. हे जवळपास एक महिन्यापर्यंत असतात. शरीरावर अनेक ठिकाणी त्वचेवर फोड येतात. याव्य़तिरिक्त यामध्ये ताप, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा यांसारखी लक्षणं दिसून येतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Pegasus Spying: 'भारतात कुणाचीही हेरगिरी नाही, सर्वांची प्रायव्हसी सुरक्षित', भारत सरकारचं स्पष्टीकरण
- Coronavirus Today : देशात 24 तासांत 38 हजार 164 नवे कोरोनाबाधित, तर 499 रुग्णांचा मृत्यू
- Coronavirus India : जुलैच्या दोन आठवड्यांत कोरोनाच्या आकडेवारीत घट नाही, प्रादुर्भाव 'जैसे थे'; काय म्हणतात आकडे?
- Third Wave Covid 19 : कोरोनाची तिसरी लाट भारतात आली आहे का? आकडे काय सांगतात?
- Coronavirus : येणारे तीन-चार महिने अत्यंत महत्वाचे; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा इशारा
- तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्राचं मिशन 100 डेज कसं असेल?