Noble Prize | रॉजर पेनरोस, रेनहार्ड गेन्जेल, अँड्रिया गेज यांना भौतिकशास्त्रातील नोबेल
रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सेक्रेटरी होरान हॅन्सन यांनी या पुरस्काराची घोषणा केली. या पुरस्कारामध्ये सुवर्ण पदकासह 11 लाख डॉलर्सपेक्षा जास्त रोख पारितोषिक आहे.
मुंबई : रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने 2020 मधील भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा एक भाग रॉजर पेनरोस आणि दुसरा भाग संयुक्तपणे रेनहार्ड गेन्जेल आणि अँड्रिया गेज यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. रॉजर पेनरोझ यांनी ब्लॅक होल फॉरमेशनद्वारे जनरल थियरी ऑफ रिलेटिव्हिटीचा अंदाज लावला जाऊ शकतो, याचं संशोधन केलं आहे. तर रेनहार्ट आणि अँड्रिया यांनी आकाशगंगेच्या मध्यभागी सुपरमॅसिव्ह कॉम्पॅक्ट ऑब्जेक्टचा शोध लावला आहे. भौतिकशास्त्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा नोबेल पारितेषिक देऊन गौरव करण्याय येणार आहे.
रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सेक्रेटरी होरान हॅन्सन यांनी या पुरस्काराची घोषणा केली. या पुरस्कारामध्ये सुवर्ण पदकासह 11 लाख डॉलर्सपेक्षा जास्त रोख पारितोषिक आहे. हा पुरस्कार स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या नावे देण्यात आला आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील नोबल पुरस्कार जाहीर, तीन शास्त्रज्ञांना 'हिपॅटायटीस सी' विषाणूच्या शोधासाठी पुरस्कारBREAKING NEWS: The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2020 #NobelPrize in Physics with one half to Roger Penrose and the other half jointly to Reinhard Genzel and Andrea Ghez. pic.twitter.com/MipWwFtMjz
— The Nobel Prize (@NobelPrize) October 6, 2020
काल वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना जाहीर झाला आहे. ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी या तिन्ही शास्त्रज्ञांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या आजारांसी लढा देण्यासाठी या तिन्ही वैज्ञानिकांनी निर्णायक योगदान दिले आहे.
नोबेल पुरस्काराचा इतिहास नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. पहिल्या नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता.